शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या *फ्लेक्स (डिजिटल) बोर्डांना आळा घालावा : विजय वहाडणे

0

कोपरगाव : संपुर्ण देशभरात व त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातही सर्वत्र फ्लेक्स (डिजिटल) बोर्ड उभारण्याचे प्रमाण भयंकर वाढले आहे.मात्र या फलकांनी शहराच्या अनेक मोक्याच्या ठिकाणी सर्वत्र अतिशय वाईट पद्धतीने आणि लावल्याने शहराचे होणारे विद्रुपीकरण त्वरित थांबवावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. आपल्या पत्रकात वहाडणे यांनी पुढे म्हटले आहे की मी नगराध्यक्षपदी आल्यानंतर नगरपरिषदेने बेकायदा फ्लेक्स बोर्ड उभारण्यास प्रतिबंध करण्याचा अनेकदा प्रयत्न केला, फ्लेक्स जप्त केले, अनेकांना आर्थिक दंडही केला.पण त्यालाही मर्यादा आल्या. शहरातील मोक्याच्या जागांवर-रहदारीला अडथळे आणणारे- रस्ते खोदून फ्लेक्स उभारतांना आपण काही चुकीचे करतोय असे या कार्यकर्त्यांना व त्यांच्या नेत्यांना वाटत नाही.
इंदिरा शॉपिंग सेंटरच्या इमारतीवरही मोठमोठे फ्लेक्स उभारले जातात.म्हणून तेथील गाळे धारकांनी या फ्लेक्समुळे *व्यवसाय करतांना अडथळे येतात-इमारतही जुनी-जीर्ण झालेली आहे, म्हणून फ्लेक्स लावू देऊ नका. असे अर्जही दिले. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी-कर्मचाऱ्यांनी असे फ्लेक्स लावू नये प्रयत्नही केले.पण राजकिय दबाव व दहशतीमुळे कारवाई करतांना कर्मचाऱ्यांना मर्यादा येतात .नगरपरिषदेचे कुठलेही शुल्क न भरता *फ्लेक्स उभारण्याचा-नगरपरिषदेचे उत्पन्न बुडविण्याचा निर्लज्जपणाही अनेकदा होतो. कर्मचारी स्थानिक असल्याने कारवाई करतांना अनेकदा अडचणीही येतात.
स्वतःच्या आईवडिलांचे* *वाढदिवस साजरे न करता नेत्यांचे वाढदिवस साजरे करणाऱ्या चेल्यांची खरे तर किवच केली पाहिजे अशी टीका यावेळी वहाडणे यांनी केली .
अवैध व्यवसाय करणारे,हप्ते गोळा करणारे,गुंडगिरी करणारे,घोटाळे करणारे,वाळू सम्राट अशांचे फ्लेक्स झळकावून आपण भावी पिढीपुढे काय आदर्श ठेवणार?
याचा विचार निदान नेत्यांनी तरी करायला हवा.
आपण स्वतः तरी कधीही स्वतःचे फ्लेक्स बोर्ड न लावण्याचे व लावू न देण्याचे पथ्य आजवर तरी पाळलेले आहे
काही काही शहरात तर अनेकदा फ्लेक्स बोर्ड फाडणे- विटंबना करणे यासारखे दुर्दैवी प्रकार घडून कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचेही प्रकार घडलेले आहेत. खरे तर आदर्श शिक्षक-आजी-माजी सैनिक-शहरातील जेष्ठ आदर्श व्यक्ती,कलाकार-खेळाडू,साहित्यिक-क्रियाशील समाजसेवक इ.चे फ्लेक्स लावायला काहीच हरकत नाही. धार्मिक सण उत्सव, महापुरुषांची जयंती- पुण्यतिथी-अभिवादन-श्रद्धांजली इ.च्या निमित्ताने फ्लेक्सवर स्वतःचेही फोटो लावण्याची काही नेत्यांना व त्यांच्या चेल्यांना फारच हौस आहे.नगरपरिषदेचे सर्व नियम पाळून-शुल्क भरूनच फ्लेक्स लावले पाहिजेत.त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्नही वाढते. नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याची मर्दुमकी गाजविणे बंद झाले पाहिजे. नेत्यांनी स्वतःच प्रतिबंध घातला तरच असे बेकायदा *फ्लेक्स बोर्ड* लावण्याचे प्रस्थ कमी होऊ शकते.अशी अपेक्षा वहाडणे यांनी व्यक्त करीत यावर एक चारोळीही म्हटली आहे.

फ्लेक्स बोर्ड पाहून कळते
शहरात महापुरुष किती
याच तमाम महापुरुषांची
शहरवासीयांना वाटते भिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here