शाँक लागून शेतमजुराचा मृत्यू

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

           आरडगाव ता.राहुरी येथिल शेतकऱ्याच्या बांधावरील वादळी वाऱ्याने विजेचे खांब उमळून पडल्याने शेतात पडलेल्या विज वाहक तारात विज प्रवाह सुरुच होता.महावितरणाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे तांदुळवाडी ता.राहुरी येथिल शेतमजुर रवींद्र रावसाहेब बर्डे याला जीव गमवावा लागला असला तरी महावितरणाने शेतात पडलेल्या विज वाहक ताराकडे ढुकुंण पाहिले नाहीच. उलट राञी उशिरा पर्यंत या विज वाहक तारातील विज प्रवाह बंद केला नाही.महावितरण आणखी कोणाचा जिव जाण्याची वाट पाहत आहे का?असा प्रश्न येथिल शेतकऱ्यांनी विचारला आहे.

         <p>  याबाबत सविस्तर माहिती अशी की,आरडगाव येथे काल झालेल्या वादळी पावसामुळे शेताच्या बांधावरील पोल उमळून पडले.तर काही ठिकाणी तारा तुटुन पडल्या होत्या.आरडगाव येथिल एका शेतकऱ्यांच्या शेतात तांदुळवाडी येथिल शेतमजूर म्हणून रवींद्र रावसाहेब बर्डे (वय-२४) कामास होता.नेहमी प्रमाणे रवींद्र हा शेतातील कामे उरकून घरी चालला असताना बांधावर पडलेल्या विज वाहक तारावर पाय पडल्याने विजेचा शाँक लागून तो शेतमजूर जागिच ठार झाला.

            शेतमजुर विज वाहक तारांना चिटकून मयत झाल्याची घटना उशिरा शेतमालकास समजली शेत मालकाने याघटनेची राहुरी पोलिस ठाण्यात खबर दिली.राहुरी पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. राहुरी पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महावितरणाने राञी उशिरा पर्यंत वादळाने तुटुन पडलेल्या तारामधील विज प्रवाह बंद केलेला नव्हता. महावितरण आणखी कोणाचा बळी घेतल्यावर तुटुन पडलेल्या तारांचा विज पुरवठा खंडीत करणार असा प्रश्न येथिल शेतकऱ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here