शाळकरी मुलीचा विनयभंग एकास अटक 

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

          सायकलवरून क्लाससाठी जात असलेल्या शाळकरी मुलीस अडवून तु गणेश  वरघुडे यास आवडतेस असे म्हणून विनयभंग केला.याबाबत घरी काही सांगितले तर तुझ्या वडिलांच्या डोक्यात दगड घालून मारुन टाकीण अशी धमकी दिल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात कणगर येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

            कणगर परिसरातील १५ वर्षीय शाळकरी मुलगी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता सायकलवरून खासगी क्लासला जात असताना समोरुन काळ्या रंगाच्या मोटारसायकवर आलेल्या दत्तात्रय अशोक वरघुडे, गणेश विठ्ठल वरघुडे (दोन्ही रा. वरघुडे वस्ती कणगर ता. राहुरी) यांनी शाळकरी विद्यार्थीनीस हाक मारली. त्यावर तिने थांबुन काय झाले असे विचारले असता अशोक वरघुडे त्या मुलीस म्हणाला की, तू गणेश वरघुडे यास आवडतेस असे म्हणाल्याने फिर्यादी घाबरुन पुन्हा सायकवर बसुन रस्त्याने जात असताना दोघांनी त्या मुलीचा पाठलाग करुन तु  याबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या वडीलांच्या डोक्यात दगड घालुन मारुन टाकीन अशी धमकी दिली.

            याबाबत पीडीत शाळकरी विद्यार्थीनीने राहुरी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेवून झाल्या प्रकाराची माहिती दिली.पोलिस निरीक्षक  दराडे यांनी पिडीत शाळकरी मुलीची फिर्याद दाखल करुन राहुरी पोलीस ठाण्यात दत्तात्रय अशोक वरघुडे, गणेश विठ्ठल वरघुडे (दोन्ही रा. वरघुडे वस्ती कणग ता. राहरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

         पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here