शाळकरी मुलीची छेडछाड करणाऱ्या दोन तरुण केले गजाआड

0

राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल घटना

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी 

राहुरी तालूक्यातील टाकळीमिया परिसरातील एक १५ वर्षीय शाळकरी मुलीची  गावातीलच दोन तरूण वारंवार छेडछाड करीत होते.छेडछाडीला वैतागून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. छेडछाडी बाबत राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पालक व विद्यार्थ्यांनी साठी जाहिर आवाहन केले होते.त्या मुलीने हिम्मतीने पोलिस निरीक्षक यांना  छेडछाडीमुळे माझी शाळा बंद झाली आहे. असा मेसेज केला.त्या शाळकरी मुली कडून छेडछाड तरुणांची माहिती घेऊन गुन्हा दाखल होत नाही तोच दोन्ही तरुणांना गजाआड केल्यामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनींना पोलिस निरीक्षकाचे पाठबळ मिळाल्याने त्या कारणामुळे शाळा बंद झालेल्या मुली फिर्याद दाखल करण्यास पुढे येत आहे. शाळा बंद केलेल्या मुली पुन्हा शाळेत जावू लागल्या.

                तालुक्यातील टाकळीमिया  येथिल १५ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा हात धरून ओढले. तीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तू आमच्या सोबत आली नाहीतर तूला उचलून नेऊ आणि ठार मारू. अशी धमकी देणाऱ्या दोन रोडरोमिओंना विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

           पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्याचा विडाच उचलला आहे. अनेक रोडरोमिओंना गजाआड केले. त्यामुळे ज्या मुलींना रोडरोमिओंचा त्रास आहे त्या मुली आता हिंमत करून समोर येत आहेत. राहुरी तालूक्यातील टाकळीमिया परिसरातील एक १५ वर्षीय शाळकरी मुलीची तेथील दोन तरूण वारंवार छेडछाड करीत होते. काही महिन्यापूर्वी पिडीत मुलगी ही शाळेत जात असताना आरोपी प्रमोद गोरडे हा तीला म्हणाला की, तु मला खुप आवडते. मला तुझ्याशी बोलायचे आहे. तु जर माझ्याशी नाही बोलली तर मी स्वतः आत्महत्या करुन घेईन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपी हा वेळोवेळी फिर्यादीचा पाठलाग करुन फिर्यादीस शाळेसमोर एकटीला बघुन तिचेजवळ जावुन छेड काढायचा. तसेच दिनांक ६ सप्टेंबर रोजी पिडीत मुलगी व तिचा लहान भाऊ घरी असतांना यातील आरोपी हे तिच्या घरासमोर आले. आरोपी प्रमोद गोरडे याने त्या मुलीचा हात पकडुन त्याचे अंगावर ओढले. आणि तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन म्हणाला की, मी तुला घेवुन जाण्यासाठी आलो आहे. तु माझ्या सोबत चल, नाहीतर मी आत्ताच जिव देईन, अशी धमकी दिली, तेव्हा दुसरा आरोपी अनिकेत जाधव याने त्या मुलीला शिवीगाळ करुन तु जर आमचे सोबत आली नाहीतर तुला उचलुन घेवुन जावू. आणि मारुन टाकु, अशी धमकी दिली आहे. 

           त्या मुलीने रोडरोमिओंच्या भितीने २० दिवसांपासून शाळेत जाणे बंद केले होते. मात्र पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या कामाची पद्धत पाहून त्या मुलीने त्यांच्या व्हाट्सअप नंबरवर मेसेज करून घडलेली घटना सांगीतली. दराडे यांनी ताबडतोब त्या मुलीची फिर्याद दाखल करून घेतली. आणि त्या दोन्ही रोडरोमिओंना ताब्यात घेऊन गजाआड केले.

           त्या मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद दिपक गोरडे, मुळ राहणार धनगर गल्ली, ता. शेवगाव. हल्ली राहणार टाकळीमियॉ ता. राहुरी व अनिकेत भाऊसाहेब जाधव राहणार टाकळीमियॉ ता. राहुरी. या दोघांवर बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम कायद्या नूसार पोस्को चा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

           या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here