
कोपरगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अहमदनगर वतीने नुकतीच कोपरगाव व राहता तालुक्याची जिल्हा क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठीची सहविचार सभा प्रवरा कन्या विद्या मंदिर , लोणी येथे संपन्न झाली. या सभेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिल्ले , खो.खो.चे राज्य क्रीडा मार्गदर्शक सुधीर चपळगावकर , कबड्डीचे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे, विशाल गर्जे , तालुका क्रीडा अधिकारी दिलीप दिघे आदी कोपरगाव व राहता तालुक्यातील क्रीडा शिक्षक उपस्थित होते .
या प्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचे प्रशिक्षण प्रवीण बानावलीकर यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भाग्यश्री बिल्ले यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करतांना क्रीडा शिक्षकाची भूमिका ही क्रीडा स्पर्धासाठी महत्वाची असते.असे सांगुन सर्वानी ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका भरून तालुका ,जिल्हा स्पर्धेत सहभागी घ्यावे असे आवाहन केले .
या सहविचार सभेमध्ये क्रीडा समितीचे मार्गदर्शक मकरंद कोऱ्हाळकर हे श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे मुख्याध्यापक झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.भागश्री बिल्ले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर तालुका क्रीडा समितीचे माजी अध्यक्ष धनंजय देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समिती स्थापन करण्यात आली .
अध्यक्ष – नितिन निकम (डॉ.सी एम.मेहता कन्या विद्या मंदिर )
उपाध्यक्ष – प्रा. शिवराज पाळणे (संजीवनी ज्युनिअर कॉलेज)
उपाध्यक्ष- अजित पवार (आत्मा मलिक क्रीडा संकुल)
सचिव -निलेश बडजाते (श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय )
सहसचिव – अनुप गिरमे (संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडिअम स्कूल )
संपर्क प्रमूख – शिवप्रसाद घोडके (संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कूल )
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली .या सर्वाचे अहमदनगर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके, सुभाष पाटणकर , प्रा.अंबादास वडांगळे, राजेंद्र पाटणकर आदीनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहोकडे यांनी केले तर आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले . या प्रसंगी क्रीडा शिक्षक नारायण शेळके, सुधाकर निलक, रमेश पटारे, संजय अमोलिक, रमेश येवले, प्रा आकाश लकारे , प्रा मिलिंद कांबळे , रवींद्र नेद्रे , नितिन सोळके , रोहित महाले , राजेंद्र देशमुख,अशोक गायकवाड, किरण बोळीज आदी क्रीडा शिक्षक उपस्थित होते .