शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पागोटे श्री काशीनगरचा राजा 2022 आयोजित रक्तदान शिबीराला उत्तम प्रतिसाद.

0

उरण दि16 (विठ्ठल ममताबादे )अध्यात्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविणारे गणेशोत्सव मंडळ म्हणून पागोटे येथील शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुप्रसिद्ध आहे.साखरचौतचा श्री काशीनगरचा राजा म्हणून येथील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे.2004 साली स्थापन झालेल्या या मंडळातर्फे आजतागायत साखरचौत निमित्त गणेशोत्सव आयोजित केला जातो. मंडळाचे गणेशोत्सवाचे हे 19 वे वर्षे आहे.19 वर्षे या मंडळातर्फे दरवर्षी विविध अध्यात्मिक, सांस्कृतिक, पारंपारिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिनांक 16/9/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत श्री काशिनगरचा राजा उत्सव शाही मंडप पागोटे येथे रक्तदान शिबीर व फ्री मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबीराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.एकूण 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

<p>यावेळी रक्तदान शिबीरासाठी सद्गुरू ब्लड बँक कोपरखैरणे नवी मुंबईचे जनसंपर्क अधिकारी हरमितसिंग कोहली, डॉ. विनोद पाटील व इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात रुग्णांचे बीपी, शुगर, ईसीजी चेक करण्यात आले व तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत सल्ला देण्यात आला.यावेळी तेरणा हॉस्पीटलचे मोलाचे सहकार्य लाभले. व्हीआयपी आय नेशन नवी मुंबई तर्फ रुग्णांचे मोफत डोळे तपासणी करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे प्रेसिडेंट संदीप म्हात्रे,सेक्रेटरी मोनिका चौकर, व्हाईस प्रेसिडेंट – सागर चौकर,जॉईन सेक्रेटरी – भूमिका सिंग, लायन्स सीमा घरत  आदी मान्यवर उपस्थित होते. रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा यावेळी बॅग देऊन सत्कार करण्यात आला.उरणमधील सामाजिक कार्यकर्ते तथा उत्कृष्ठ निवेदक सुनिल वर्तक  यांनी रक्तदानाचे महत्व या विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले. एकंदरीतच आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पागोटे, स्टेप आर्ट सामाजिक संस्था, आम्ही पिरकोनकर समूह, जरी मरी नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ, सारडे विकास मंच, मोरया साई गोविंदा पथक कुंडेगाव यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here