उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांच्या वतीने बुधवार दिनाकं 19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता बेलापूर, नवी मुंबई येथे शिवसेना(श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तडीपार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याचे सरकारने सूडाच्या भावनेत शिवसैनिकांवर सरकार विरूद्ध बोलेल त्याला पोलीसी खाक्या दाखवणं ,धमक्या देणे ,तडीपार करणे अशा अन्यायकारक गोष्टी सुरू केल्या आहेत. म्हणूनच पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार सि पी ऑफिस,बेलापूर सकाळी 11:00 वाजता या सरकार च्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार आहे तरी उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी या तडीपार मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी केले आहे. बेलापुर मैदान येथे सर्वांनी एकत्र जमायचे असून असून वाहनांनी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे.अशी माहिती मनोहर गजानन भोईर माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख यांनी दिली आहे.