उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )बुधवार दिनाकं 12 सप्टेंबर 2022 रोजी रोजी मातोश्री ,मुंबई येथे जेष्ठ साहित्यिक व रायगड भूषण प्रा एल बी पाटिल यांनी शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर लिहिलेले आभाळ सुर्य हिंदुत्वाचा(1990) व साहित्यिक गुंजार पाटील यांनी लिहिलेले एका महापुरुषांची महायात्रा ( 2017) ही दोन पुस्तके महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, गटनेते गणेश शिंदे, विधी सेल तालुका अध्यक्ष मच्छिद्र घरत व शाखाप्रमुख मणीराम पाटील उपस्थित होते.