शिवीगाळ व विनयभंग केल्याची घटना जामखेड शहरात घडली प्रमुख आरोपी सह तिघांवर गुन्हा दाखल

0

आरोपी फरार असुन जामखेड पोलीस आरोंपीचा शोध घेत आहे 

जामखेड तालुका प्रतिनिधी 

जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी येथे मोकळया जागेचे वादावरुन एका महिलेचा विनयभंग व शिवीगाळ केल्याच्या घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला

 सविस्तर असे की, फिर्यादी जामखेड शहरातील पिडीत महिला या घरी असताना यातील आरोपी दत्तात्रय सदगुरु चऱ्हाटे व इतर तीन अनोळखी व्यक्ती यांनी घरामध्ये घुसुन फिर्यादीस पाणी मागीतले असता फिर्यादीने त्यांना घरातील पाणी दिले ते पाणी न पिता फिर्यादीस म्हणाले की तुम्ही कोर्टात दावा का करता असे म्हणुन शिवीगाळ करु लागले त्यावेळी फिर्यादी त्यांना समजावुन सांगत असताना त्याचा त्यांना राग आल्याने आरोपी यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीस
लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला व फिर्यादीचे गळयातील सोन्याचे दागीने तोडले. व ते तेथुन निघुन गेले. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय सदगुरु चऱ्हाटे रा. तपनेश्वर गल्ली जामखेड ता जामखेड व तीन अनोळखी इसम यांचे विरुद्ध गु.र.नं. व कलम :- ४४५ /२०२२ भा.द.वि. कलम ४५२, ३५४,३२७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला असुन. ही घटना जामखेड शहरातील शिक्षक कॉलनी येथील फिर्यादीचे राहते घरात, दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल एस.डी लोखंडे हे करत आहेत.
ReplyReply allForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here