शेतकर्‍यांना घेऊन प्राजक्त तनपुरेंनी गाठले पोलीस ठाणे ; पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

त्या पोलिस उपनिरीक्षकाने ग्राहक मंचात जाण्याचा दिला सल्ला 

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  राजेंद्र उंडे 

पीक विम्याचा प्रिमियम भरला जातो.त्यापेक्षा हि भरपाई कमी दिली जाते. विमा नेमका कशासाठी उतरविला जातो.भरलेल्या रक्कमेच्या कवचानुसार शेतकऱ्यांचे अंदाजे झालेले नुकसान त्या प्रमाणात भरपाई देण्या ऐवजी विमा कंपणी सर्रास शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे  यांच्या नेतृत्वाखाली आज शनिवारी सायंकाळी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले.

          पीक विमा कंपनीच्या विरोधात संतप्त शेतकऱ्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे  यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी थेट राहुरी पोलीस ठाणे गाठले. पीक विमा कंपनीने फसवणूक केल्याची तक्रार देऊन, संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.माञ राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्या ऐवजी निवेदन देण्यास सांगुन सरळसरळ विमा कंपणीची बाजु घेतल्याने कायद्याने गुन्हा दाखल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.राहुरी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने या शेतकऱ्यांना ग्राहक मंचात जाण्याचा सल्ला दिला आहे.

          अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक-दीड हजार रुपयात बोळवण थांबवा. नुकसानीच्या पंचनाम्याप्रमाणे पीक विम्याची रक्कम मिळावी. अन्यथा, पीक विमा कंपनी विरुद्ध फसवणूक झालेले शेतकरी गुन्हे दाखल करतील. असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शुक्रवारी झालेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी व पीक विमा प्रतिनिधी, अधिकारी यांच्या बैठकीत दिला होता.

            पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे धोरण चालू ठेवल्याने आज शनिवारी  सायंकाळी संतप्त शेतकऱ्यांनी आमदार तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस ठाणे गाठले. एचडीएफसी इरगो विमा कंपनीचे अधिकारी रामचंद्र दराडे पोलीस ठाण्यात उपस्थित होते.‌ तेरा शेतकऱ्यांनी विमा कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरला.परंतू पोलिसांनी गुन्हे दाखल करण्या ऐवजी  निवेदन देण्यास सांगितले.

             पोलिस निरीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, “एचडीएफसी इरगो विमा कंपनीकडे पीक विम्याचा हप्ता भरला होता. आमच्या पीकाची सुमारे ७० टक्के नुकसान झाल्याचे पंचनामे कंपनीच्या प्रतिनिधीने आमच्या शेतावर येऊन केले होते. परंतु, आम्हास त्या प्रमाणात नुकसान भरपाई न मिळता तुटपुंजी रक्कम देण्यात आली. काही प्रकरणांमध्ये आम्ही भरलेल्या प्रीमियम पेक्षा देखील कमी रक्कम आम्हाला मिळाली. त्यामुळे, कंपनीने फसवणूक केली आहे.विमा कंपणीवर फसवणूकीचा गुन्हा  दखल करावा,शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली.

              निवेदनावर सचिन वराळे, गोरक्षनाथ वराळे, राजेंद्र म्हसे, संदीप झुगे, सुभाष काळे, अर्जुन वने, सतीश म्हसे, गणेश कैलास झुगे, अक्षय वने, वसंत जाधव, सचिन पानसंबळ, संदीप कदम, संदीप लगे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here