कोपरगांव दि. ६ ऑक्टोंबर
शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणा-या घटकांची सामग्री शेतक-यांना त्यांच्या बांधावर एकाच दालनात उपलब्ध व्हावी हा दुरदृष्टीकोन माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कायम ठेवत त्याची व्यवस्था शेतकरी संघाच्यामार्फत निर्माण केली, तोच विचार पुढे घेवुन शेतक-यांच्या समृध्दीसाठी झटत रहायचे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील शिरसगांव येथे सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्या नवव्या शाखेचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारी करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शेतकरी संघाच्या आठ शाखा कार्यरत असुन पुर्व भागातील शेतकरी बांधवांनी नव्याने शाखा सुरू करावी म्हणून मागणी केली होती. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने पुर्व भागाच्या विकासासाठी संघर्ष करत काम केले. आज बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत सर्वत्र स्पर्धा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आता किटकनाशक फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान आले आहे शेतक-यांनी ते अवगत करावे त्यासाठी संघ आर्थीक सहकार्य देवून शेती विकासात मदत करेल. इफकोने नॅनो तंत्रज्ञानातुन युरिया खतासह शेतीसाठी आवश्यक उत्पादने आधूनिक तंत्रज्ञानाने विकसीत केली आहेत शेतक-यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
प्रारंभी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजीराव गावंड यांनी प्रास्तविक केले. उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संतोष भागवत व सौ मंगल भागवत या उभयतांच्या हस्ते सत्यनारायण महापुजा करण्यांत आली. इफकोचे अहमदनगर क्षेत्र अधिकारी तुषार गोरड, प्रमोद नेरकर, इश्वर चोखर, क्षेत्रीय विपणन व्यवस्थापक अमोल जाधव यांनी इफको खते व शेतीविषयक उत्पादने कशी सरस आहे व त्याच्या वापराने शेती उत्पादनांत होणा-या वाढीबददल माहिती दिली.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, केशवराव भवर, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, उत्तमराव चरमळ, माजी सभापती महेंद्र काले, संघाचे संचालक सर्वश्री. बबनराव निकम, वाल्मीक भास्कर, रघुनाथ फटांगरे, चंद्रकांत देवकर, विश्वासराव गाडे, कल्याणराव चांदगुडे, अरूण भिंगारे, सुभाषराव गायकवाड, संजय भाकरे, छबुराव माळी, सुभाष कानडे, चंद्रकांत कुलकर्णी, सोमनाश राशिनकर, हबीब पटेल, गोरख चौधरी, महंमद पटेल, ऋषीकेश भोकरे, नजिम पटेल, ज्ञानदेव भागवत, शकीलभाई पठाण, दादा सुभे, शिवाजीराव भगुरे, रावसाहेब जाधव, अनिल मलिक, गोविंद मलिक, अशोक शिंदे, मनोज पुते, अशोक निवृत्ती शिंदे, अंबादास पाटोळे, प्रकाश गव्हाळे, किसन गव्हाळे, शिवाजी जाधव, अशोक गायकवाड, रविंद्र देशमुख, वाल्मीक भिंगारे, रविंद्र रांधवणे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, शिरसगांव पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संघाचे व्यवस्थापक हरिभाऊ गोरे यांनी आभार मानले.
फोटोओळी-कोपरगांव
शिरसगांव येथे सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाच्या नवव्या शाखेचा शुभारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर युवानेते जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले. (छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी)