कोपरगांव : दि. १३ सप्टेंबर २०२२
शहरातील मोहनीराजनगर येथील रहिवासी संजय सुनिल मुंगसे यांची हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत दुबईत दोन वर्षासाठी शेफ म्हणुन निवड झाल्याबददल भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. चिरंजीव संजय मुंगसे हे संजीवनी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी सुनिल पंढरीनाथ मुंगसे यांचे चिरंजीव आहेत. संजय मुंगसे याने मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवत मोहनीराजनगर परिसराचा नांवलौकीक वाढविला असे सौ. स्नेहलताताई कोल्हे सत्कारप्रसंगी बोलतांना म्हणाल्या.
<p>त्याच्या निवडीबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संजीवनी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रदिप नवले, उपाध्यक्ष राजेंद्र परजणे, व्यवस्थापक विलास रोहमारे आदिंनी अभिनंदन केले.
या सत्कार प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरचिटणीस दिपक चौधरी, प्रसाद औताडे आदि उपस्थित होते. चिरंजीव संजय मुंगसे याचे दहावी पर्यंतचे शिक्षण एस जी विद्यालयात तर अकरावीचे शिक्षण के जे सोमैया महाविद्यालयात झाले. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे तत्कालीन आमदार असतांना त्यांची शासनाच्या योजनेअंतर्गत हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी चिरंजीव संजय मुंगसे याची निवड केली होती त्यात त्याचा पहिला क्रमांक आला होता.
फोटोओळी- कोपरगांव
कोपरगांव मोहनीराजनगर येथील चिरंजीव संजय सुनिल मुंगसे याची हॉटेल मॅनेजमेंट अंतर्गत शेफ म्हणून दुबईत निवड झाल्याबददल त्याचा भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यांत आला. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सरचिटणीस दिपक चौधरी, वडील सुनिल मुंगसे उपस्थित होते.
(छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी)