कोपरगाव : श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाच्या वतीने मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून विदयालयात उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाला विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, विदयालयांचे उपमुख्याध्यापकश्री.आर.बी.गायकवाड, पर्यवेक्षक श्रीमती यु.एस.रायते, ए.बीअमृतकर ,ए.के.काले ,डी .व्ही.विरकर , डी.पी.कुडके, एन.के.बडजाते ,ए.जे.कोताडे,एस,डी.गोरे,आर.जे.चौधरी,बी.सी.उल्हारे,आर.आर.लकारे,एस.एन.शिरसाळे आदी शिक्षक व विदयार्थी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले. उपमुख्याध्यापक रवि पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.
मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर या वेळी म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवरील कोरोनाच्या आजारा नंतर क्रीडा क्षेत्रातील स्पर्धा सुरु झाल्या असुन शासनाने शालेय स्पर्धा सुरु करणे आवश्यक आहे.कारण क्रीडा स्पर्धातुनच मुलांचा सर्वांगिण विकास होते. आज क्रीडा क्षेत्रातील मोठा दिवस आहे यातुनच खेळाडुंनी प्रेरणा घेवुन आपल्या आवडत्या खेळात नैपुण्य मिळवावे असे ते म्हणाले.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांचे स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे ,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप कुमार अजमेरे व सहसचिव सचिन अजमेरे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक एन.के.बडजाते यांनी तर आभार ए.के.काले यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यालयांतील सर्व शिक्षक तसेच विदयार्थी उपस्थित होते.