कोपरगांव : कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालया मध्ये ३१ऑक्टोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला. श्री.गो.विदयालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोपरगांव येथिल श्रीमान गोकुळचंदजी विदयालया मध्ये ३१ऑक्टोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्री.गो.विदयालयात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते झाले.
या वेळी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देश एकसंघ रहावा म्हणून केलेले कार्य समजावुन सांगितले.
या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पाटणी मॅडम, विदयालयांचे ग्रंथपाल ए.एल.आव्हाड,एन.डी.होन,डी.ए.देसाई,एस.एन.शिरसाळे,इ.एल.जाधव ,शैलेश गाडेकर आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
विदयालयांचे जेष्ठ कला शिक्षक ए.बी.अमृतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन एन.के.बडजाते यांनी तर आभार जेष्ठ क्रीडा शिक्षक ए.के.काले यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे यांनी राष्ट्रीय एकता दिवसांच्या सर्वाना शुभेच्छा दील्या.