जामखेड तालुका प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी,पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज १३५ वी जयंती त्यानिमित्ताने विद्यालयात सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले.
विद्यालयाचे प्राचार्य रमेश वराट यांच्यासह स्कूल कमिटीचे पांडूरंग सोले , बापु गदादे,शालेय व्यवस्थापन समितीचे अविनाश सोले तसेच संतोष निरगुडे, शंकर गदादे, सतिष बोरा व मान्यवरांनी कर्मवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सजवलेल्या रथात कर्मवीरांच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
सजवलेल्या रथात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेसमोर विविध वेषभूषा केलेले बालगोपाळ आणि त्यांच्यासमोर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करण्यात आले.
यामध्ये ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनींचे व दहावीच्या विद्यार्थ्यांनींचे लेझीम पथक,टिपरी नृत्य,झांज पथक,टाळ नृत्य,सादर करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांसह,ग्रामस्थांनी जोशात कार्यक्रमाला उस्फूर्त दाद दिली.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य रमेश वराट, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिपक तुपेरे ,दत्तात्रय कसबे , निबोरे, शिंदे, कदम, नवले,.गोस्वामी,. तांबोळी पवार, करपे, आडे, शेळके व सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Attachments area