श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवा संघटनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी पदाधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

0

उरण दि 2 (विठ्ठल ममताबादे ) कार्तिक शुद्ध पौर्णिमे निमित्त शिवभक्तांचे श्रध्दास्थान, वीरशैव लिंगायत समाजाचे श्रध्दास्थान असलेले श्री क्षेत्र कपिलधार ता .जिल्हा- बीड (महाराष्ट्र) येथे सोमवार दि 7 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता 21 वे शासकीय महापूजा व त्या नंतर लगेचच  शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या माध्यमातून 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन श्री क्षेत्र कपिलधार येथील शिवातीर्थ मैदानावर करण्यात आले आहे.जास्तीत जास्त वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी व शिवा संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष  प्रा.मनोहर धोंडे यांनी केले आहे. मुंबई, नवी मुंबई व कोकणातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी श्री क्षेत्र कपिलधार(जिल्हा बीड )ला जाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पदाधिकाऱ्यांच्या फोन नंबर वर संपर्क साधावे.

रुपेश होनराव(डोंबिवली )-9892869039

नारायण कंकणवाडी(पनवेल )-

9594862000

विनायक म्हमाने (रायगड )-9967544387

शांतेश्वर गुमते (पालघर )-8390908146

शिवा बिराजदार (ठाणे जिल्हा )-9820535330

डी एम कोराळे (नवी मुंबई )-9987030967

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here