उरण दि 9(विठ्ठल ममताबादे ) श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जिकंलेले गड किल्ले व त्या गड किल्ल्यांचे संरक्षण, संवर्धन व्हावे तसेच लहान बालकांना महाराष्ट्रातील शोर्य, पराक्रमी इतिहासाची ओळख व्हावी, बालकांना गड किल्ल्याविषयी आवड निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी सणाचे औचित्य साधून गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी गड किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भारतीय संस्कृतीचा एक भाग असलेल्या दिवाळी सणात घरासमोर मांगल्याचे प्रतीक म्हणून रांगोळी काढली जाते. ही संस्कृती टिकून राहावी. या रांगोळी कले विषयी समाजात जास्तीत जास्त जनजागृती व्हावी. या कलेला प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने खास महिला भगिनींसाठी रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.दोन्ही स्पर्धा या उरण तालुका मर्यादित आहेत. उरण तालुक्या बाहेरील व्यक्तीला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. गड किल्ले स्पर्धेसाठी पहिला गट (वयोगट 3 ते 5), दुसरा गट (वयोगट 6 ते 12), तिसरा गट (वयोगट 13 ते 20), खुला गट (वयोगट 21 पासून पुढे )असे स्पर्धेसाठी गट आहेत. तर रांगोळीसाठी पहिला गट (वयोगट 6 ते 11), दुसरा गट (वयोगट 12 ते 21)तर तिसरा गट (वयोगट 22 ते पुढे )असे स्पर्धेसाठी वयोगट आहे. अशा गटात स्पर्धा संपन्न होणार आहेत.सदर गडकिल्लेचे फोटो व रांगोळी स्पर्धेचे फोटो स्पर्धकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील व्हाट्सअप नंबर – 80971 00073, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे व्हाट्सअप नंबर-9702751098 या नंबर पाठवायचे आहेत. सदर स्पर्धेला रविवार दि.16/10/2022 रोजी सुरवात होईल व सदर स्पर्धेचा अंतिम दिनांक 26/10/2022 असेल.नाव नोंदणीचा अंतिम दिनांक 16/10/2022 आहे.रविवार दिनांक 30/10/2022 रोजी सकाळी 10 वाजता रँकर्स अकॅडेमी, कोप्रोली चौक, कोप्रोली -तालुका उरण, जिल्हा रायगड येथे बक्षीस वितरण करण्यात येईल.
स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे
1)स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
2)रांगोळी आणि गडकिल्ले स्पर्धा आप आपापल्या घरासमोरच होईल.
3)स्पर्धकांनी गड किल्ले स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे फोटो आयोजकांनी दिलेल्या व्हाट्सअप नंबरवरच पाठवावे.फोटो पाठविताना संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर पाठवावे.
4)सदर स्पर्धा फक्त उरण तालुका मर्यादित आहे.
5)स्पर्धेच्या बाबतीत किंवा बक्षीस वितरणाच्या बाबतीत अंतिम निर्णय पंच किंवा अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांचा राहील.