श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान .

0

उरण दि 2(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवरात्रौत्सव निमित्त रविवार दिनांक 2/10/2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत प्रतीक सुधीर मुंबईकर यांचे रँकर्स अकॅडेमी, कोप्रोली चौक, कोप्रोली  येथे उरण तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या एकूण 9 महिलांचा (नव दुर्गांचा )सन्मान करण्यात आला.सामाजिक क्षेत्र -हेमलता पाटिल (बोकडविरा ),वैद्यकीय क्षेत्र -डॉ.रंजना म्हात्रे(खोपटे ),पत्रकारिता -कु.श्वेता भोईर(विंधणे ),वाहतूक क्षेत्र – अंजली जोशी(टाकीगाव),उद्योजिका -स्मिता म्हात्रे (पाले ),स्वच्छता कर्मचारी -राजश्री पाटील(ग्रामपंचायत साफसफाई कर्मचारी कोप्रोली  ), -ऍड. वर्षा पाठारे (उरण ),शिक्षण क्षेत्र- शिक्षिका रचना ठाकूर(खोपटे ),पोलीस प्रशासन (ट्रॅफिक )-निता विजय  डाऊर(करंजा उरण )यांचा साडी व भेट वस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

व्यासपीठावर उपस्थित उद्योजक कैलास म्हात्रे, आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, शिक्षिका साधना मुंबईकर, जेष्ठ शिक्षिका वर्षा धनाजी म्हात्रे, रँकर्स अकॅडेमीचे मालक प्रतीक मुंबईकर, आदर्श शिक्षक संजय होळकर यांनी नवदुर्गाचा सन्मान केला. यावेळी अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधीर मुंबईकर यांनी सांगितले की श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचा मी सल्लागार आहे. संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्यात वेगवेगळे कार्यक्रम होतात. सामाजिक बांधिलकी जपत संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.आज महिलांचा सन्मान करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. खूपच सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. असे गौरवोदगार काढले.शिक्षक संजय होळकर यांनीही मुला मुलींना समान संधी दया, समान शिक्षण दया असे सांगत मुला मुली मध्ये भेदभाव करू नका असे सांगितले. विविध मान्यवरांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.

 नवदुर्गाचा सन्मान करण्यात आलेल्या महिलांचा विशेष सत्कार झाल्याने महिला वर्गांनी, सत्कार मूर्तीनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे विशेष आभार मानले. यावेळी सन्मान झालेल्या महिलांनी आपल्या मनोगतातून महिलांवर कसे अन्याय होतात. ते कसे दूर केले पाहिजेत याविषयी परखडपणे मत मांडले. महिलांवर होणाऱ्या अन्याया विरोधात सर्वांनी एकत्र यावेत असेही आवाहन या नवदुर्गातर्फे करण्यात आले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटिल, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सचिव -प्रेम म्हात्रे,खजिनदार -सुरज पवार, संपर्क प्रमुख -सुविध म्हात्रे,सल्लागार -सुनिल वर्तक,माधव म्हात्रे,कुमार ठाकूर,हेमंत ठाकूर, शुभम ठाकूर, प्रणित पाटिल, साहिल म्हात्रे, समीर पाटिल, प्रकाश म्हात्रे आदी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे सल्लागार तथा प्रसिद्ध निवेदक सुनिल वर्तक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here