संगमनेरात उपअधीक्षकांच्या पथकाने आवळल्या गुटखा तस्कराच्या मुसक्या

0

संगमनेर : मोपेड वरून गुटख्याच्या तीन गोण्या घेऊन जाणाऱ्या गुटखा तस्कराच्या संगमनेर विभागाच्या उपअधीक्षकांच्या पथकाने मुसक्या आवळत तब्बल एक लाख एकतीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला.

         रविवार (दि.११) सप्टेंबर रोजी सायंकाळी संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना शहरातील भारत नगर परिसरात एक इसम गुटखा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती समजली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकातील  अण्णासाहेब दातीर, सुभाष बोडखे, अमृत आढाव आणि प्रमोद गाडेकर यांना आवश्यक त्या सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावर या पथकाने भारत नगर परिसरात सापळा रचला असता सात वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या मोपेड वरून एक जण तीन गोण्या घेऊन जात असल्याचे या पथकाला दिसले. पोलिसांनी त्याला थांबवत  झडती घेतली असता मोपेड वर बांधलेल्या दोन पांढऱ्या व एका पिवळ्या रंगाच्या गोण्यामध्ये हिरा पान मसाल्याचे २१० पॅकेट आणि रॉयल कंपनीचे २१० पाकिटे असा एकतीस हजार पाचशे रुपयांचा बंदी असलेला गुटखा आणि एक लाख रुपये किंमतीची मोपेड क्रमांक एम एच  १७ सी.टी ७४८६ असा एकूण एक लाख एकतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पो.कॉ. सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपी अबरार सलीम शेख रा. भारत नगर, संगमनेर याच्यावर भा.द.वि कलम १८८,२७२,२७३,३२८  अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ च्या अधिनियमाचे कलम ५९ , २६ (२), (४) दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here