संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाची नेमणूक करा – सुनीलभाऊ उकीॅडे     

0

 संगमनेर  : संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पद तत्कालीन पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या बदलीमुळे गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे. तालुका पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने तात्काळ या जागी कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ उकीॅडे यांनी केली आहे.

           पांडुरंग पवार यांच्या बदलीनंतर नवीन पोलीस निरीक्षकांची नेमणुक झाली नसल्याने या जागी सक्षम पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ उकीॅडे यांनी केली आहे. याबाबत श्री.उकीॅडे यांनी असे म्हटले आहे की संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक पदाचा पदभार पांडुरंग पवार यांच्याकडे होता. मात्र त्यांची गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथे बदली झाल्याने त्यांच्या जागी अद्यापही नुतन पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सध्या प्रभारी म्हणून घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे काम पहात आहेत. तालुका पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने नेमणुकीस असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. तसेच नूतन पोलीस निरीक्षक  नसल्याने तालुक्यातील अनेक नागरिकांना आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्याकारणाने मोठी गैरसोय होत आहे. त्यासाठी लवकरात लवकर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ उकीॅडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here