संगमनेर दंत रुग्णालयातील तपासणी शिबीरात २७६ रुग्णांची स्क्रीनिंग

0

संगमनेर : एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तोंडाचा कर्करोग (कॅन्सर) तपासणी शिबीर संगमनेर येथील एसएमबीटी दंत रुग्णालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल २७६ रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली. संशयित रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
            तोंडाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी शारीरिक आणि हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासण्या केल्या जातात. तसेच डाग पडणे, बायोप्सी आणि रेडिओलॉजिकल तंत्रे वापरून हा कर्करोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होणे हे रुग्णासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते.वेळीच कर्करोगाचे निदान झाल्यास उपचार करणे सोपे होते. परिणामी ९० टक्के नागरिकांना जीवनदान मिळू शकते. याच हेतूने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.  विशेष म्हणजे, पाच दिवसीय शिबिराला मोठ्या संख्येने नागरिकांनी प्रतिसाद दिला.
एसएमबीटी दंत रुग्णालयात परिसरातील मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येतात. तोंडाचा कॅन्सर तपासणी शिबिरास मोठ्या संख्येने रुग्णांनी प्रतिसाद दिला. यापुढेही दंत रुग्णालयात या तपासण्या नियमित सुरु राहणार आहेत. तोंडाचा कुठलाही त्रास सुरु असल्यास रुग्णांनी तात्काळ तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट :- कॅन्सरचे हे उपचार उपलब्ध
तोंडाचा कॅन्सर, घश्याचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर, जनेंद्रियाचा कॅन्सर, लहान मुलांचा कॅन्सर, व्याधी आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया आदींसह दर्जेदार उपचारांची सुविधा धामणगाव येथील ‘एसएमबीटी हॉस्पिटल’मध्ये उपलब्ध आहेत. यासोबतच  अल्पदरात रक्त, लघवी तपासणी, सिटी स्कॅन व एमआरआय तपासणीदेखील सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

                                प्राचार्य, डॉ. अशोक पाटील,

                        दंत रुग्णालयात आणि कॉलेज संगमनेर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here