संजीवनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १३३ अभियंत्यांची  विप्रो मध्ये निवड-श्री. अमित कोल्हे

0

कोपरगांवः आपल्या मुलाने किंवा मुलीने शिकून  त्याला किंवा तिला नोकरी मिळून स्वावलंबी बनावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. मागील अनेक वर्षांपासून  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने शेकडो विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळत असल्याने अनेक पालक त्यांच्या पाल्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी संजीवनीमध्ये दाखल करतात. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालया मार्फत पालकांच्या व पाल्यांच्या महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी जाणिव पुर्वक प्रयत्न केले जातात. याच अनुषंगाने  विप्रो टेक्नाॅलाॅजी, पुणे या साॅफ्टवेअर क्षेत्रात आघाडीच्या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत संजीवनीच्या १३३ नवोदित अभियंत्यांची  निवड करून त्यांनी व पालकांनी पाहीलेले स्वप्न पुर्ण केले, अषी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी दिली.
विप्रो कंपनीने निवड केलेले सर्व विद्यार्थी हे ग्रामिण भागातील असुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक,  सहकार महर्षि  कै. शंकरराव  कोल्हे यांना ग्रामिण भागातील विद्यार्थी स्वावलंबी झाल्यास विशेष  आनंद वाटायचा. त्यांना विद्यार्थी निवडीची वार्ता कळताच ते विध्यार्थ्यांचे  व पालकांचे अभिंनदन करायचे. अलिकडेच विप्रो कंपनीने 2021-22 या षैक्षणिक वर्शात अंतिम वर्शात षिकलेल्या नवोदित अभियंत्यांची निवड जाहिर केली. यामध्ये काॅम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन  टेक्नाॅलाॅजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व सिव्हील इंजिनिअरींगच्या एकुण १३३ अभियंत्यांची नोकरीसाठी निवड केली.

श्री कोल्हे पत्रकात पुढे म्हणाले की संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश  घेतल्यावर महाविद्यालयाच्या प्रयत्नातुन विध्यार्थ्यांना  नोकरी मिळणारच, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये  कधीही जास्तीचा ताणतणाव निर्माण न होता मुलाखतींना सामोरे जाण्यासाठीची अगदी नियोजनबध्द तयारी प्रत्येक उपक्रमातुन करण्यात येते. याचा प्रत्यय विध्यार्थ्यांना  मुलाखतीमधुन निवड झाल्यावर येतो.
   नवोदित  अभियंत्यांच्या या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो ओळीः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांचे समवेत विप्रो टेक्नाॅलाॅजी या कंपनीत नोकऱ्यांसाठी  निवड झालेले विद्यार्थी आणि प्रयत्न करणारा प्राद्यापक वर्ग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here