संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १६ अभियंत्यांची बाॅश  मध्ये निवड-श्री अमित कोल्हे

0
  एसएपी प्रशिक्षणातून विध्यार्थ्यांनी  मिळविले यश
कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित एमबीए, इंजिनिअरींग, पाॅलीटेक्निक, फार्मसी, सिनिअर काॅलेज मधिल विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या  मिळवुन देवुन पालक व विध्यार्थ्यांची  नोकरदार होण्याची  स्वप्ने पुर्ण करण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन अनेक प्रयत्न करण्यात येतात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने एसएपी (सॅप) या प्रशिक्षण देणाऱ्या  जागतिक पातळीवरील कंपनीशी  सामंजस्य करार केला केला आहे. या कंपनीचे एक केंद्र संजीवनी मध्ये असुन या केंद्राद्वारे विध्यार्थ्यांना  प्रशिक्षण देवुन सक्षम केल्या जाते. अलिकडेच या केंद्रातुन प्रशिक्षण घेतलेल्या संजीवनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १६ नवोदित अभियंत्यांची बाॅश  ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  कंपनीने सुरूवातीस रू ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवुन निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
         ग्लोबल साॅफ्टवेअर लि. या कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये उत्कर्ष  अनिल आहेर, केतकी भुवनेश्वर  भिरूड, श्रृती सिध्दार्थ जावळे, निकिता आबासाहेब जाधव, प्रथमेश  हरेश  कदम, कृष्णा  केशव गुडदे, तृप्ती बाबासाहेब चिकने, सचिन वाल्मिक धट, गौरव भिमराव आगवन, सुमेधा संजय सम्रित, असिफ रशिद शेख , सिध्दांत सचिन पुंड, प्रणाली अशोक चौधरी , संचिता  अशोक  गोसावी, सोहम बाबासाहेब सुर्यवंशी  व अशोक  चांगदेव देवरेे यांचा समावेश  आहे.
विध्यार्थ्यांच्या  या निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व सॅपचे समन्वयक डाॅ. ए. बी. पवार, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके यांचे अभिनंदन केले व निवड झालेल्या विध्यार्थ्यांना  भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
...........
नवोदित अभियंत्यांच्या प्रतिक्रिया
‘मी कोपरगांव तालुक्यातील संवत्सर गावचा रहिवासी असुन माझे वडील शेतकरी आहे. मी संजीवनी मध्ये शिकत  असतानाच एसएपीचा (सॅप)कोर्स केला. इतर ठिकाणी  शिक्षण  पुर्ण झाल्यावर मोठ्या शहरात जावुन विध्यार्थी हा महागडा व सर्वसामान्यांना न परवडणारा कोर्स करतात. परंतु सॅपचे संजीवनीमध्येच अधिकृत केंद्र असल्यामुळे इंजिनिअरींगची पदवी आणि नोकरीचे पत्र बरोबरच मिळाले.’-गौरव आगवन (9370841926)

‘मी तालुक्यातील भोजडे येथिल रहीवासी असुन माझे वडील हयात नाही. माझी मोठी बहिण बीडीएस करीत आहे. माझ्या आईने मला व बहिणीला जिध्दीने षिकविले. मला नोकरी मिळावी, हे आईचे स्वप्न होते. आईचे स्वप्न मी सॅपच्या कोर्समुळे पुर्ण करू शकलो.’-सचिन धट (8329069190)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here