संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १०विध्यार्थ्यांची व्हर्चुसा मध्ये निवड -व्हाईस प्रेसिडेंट नारायणन

0

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व व्हर्चुसा मध्ये सामंजस्य करार
कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय ही शैक्षणिक  स्वायत्ता (अकॅडमिक  ऑटोनॉमस ) असलेली संस्था असल्यामुळे येथिल विध्यार्थ्यांना  आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आहे. पहिल्या फेरीत आम्ही संजीवनीचे १० विध्यार्थी निवडले असुन सुरूवातीस त्यांना रू ५- ५ लाखांचे वार्षिक  पॅकेज देण्यात येईल.तसेच येथिल व्यवस्थापन व प्राद्यापक  यांचा आधुनिक शिक्षणाकडे  कल असल्याचे निदर्शनास  आल्यामुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाबरोबर सामंजस्य करार करीत असुन आमच्या कंपनीच्या वतीने येथे सेंटर ऑफ  एक्सलन्सची स्थापनाही करीत आहोत, अशी घोषणा  व्हर्चुसा कार्पोरेशन या बहुराष्ट्रीय  कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री नारायणन एस यांनी केली.
      संजीवनी  अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये व्हर्चुसा कार्पोरेशन बरोबरचा सामंजस्य करार, सेंटर  ऑफ  एक्सलन्सची स्थापना व व्हर्चुसा मध्ये निवड झालेले  अभियंते व त्यांच्या पालकांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रमात श्री नारायणन एस प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी या संस्मरणीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविले. यावेळी व्हर्चुसा कंपनीच्या असोसिएट डायरेक्टर टेक्नाॅलाॅजी मोहनाप्रिया एस, लिड कन्सलटंट अनुशा डीएन,डायरेक्टर डाॅ. ए.जी.ठाकुर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागाचे प्रमुख डाॅ. डी. बी. क्षिरसागर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन डाॅ. विशाल  तिडके, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख प्रा. अतुल मोकळ, व्हर्चुसाने निवड केलेले विध्यार्थी व त्यांचे पालक, सर्व विभाग प्रमुख  व इतरही विध्यार्थी उपस्थित होते.
       प्रारंभी डाॅ. क्षिरसागर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कंपनीबाबत माहिती देताना सांगीतले की व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे.या कंपनीची स्थापना १९९६ साली श्रीलंकेत झाली आणि तिचे मुख्यालय दक्षिण अमेरीकेत मॅसेच्युसेटस् येथे आहे. या कंपनीबरोबर सामंजस्य करार झाल्यामुळे आता शिक्षक  आणि विध्यार्थी यांना अधिकच्या प्रशिक्षणाची  संधी उपलब्ध झाली आहे.
डाॅ. ठाकुर यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पी.एचडी. पर्यंतच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती देवुन विविध क्षेत्रातील संजीवनीने स्थापित केलेल्या कीर्तिमानांची थोडक्यात माहिती दिली.
        अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री कोल्हे म्हणाले की ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान अवगत असले पाहिजे, अशी  तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांची असायची. या दृष्टीने  संजीवनीने व्हर्चुसा बरोबर टाकलेले पाऊल महत्वपुर्ण आहे. व्हर्चुसा कंपनीने ग्रामिण भागातील संजीवनीबरोबर सामंजस्य करार करून सेंटर ऑफ  एक्सलन्सही दिले. त्याबध्दल समाधान व्यक्त केले. कै. कोल्हे यांच्या दुरदृष्टीनुसार , अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीच्या माध्यमातुन पालक व विद्यार्थ्यांचे  स्वप्न पुर्ण करण्यासाठी व्यवस्थापन कटीबध्द असणार आहे.
श्री नारायणन एस शेवटी म्हणाले की देशात ८५ पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्हर्चुसाने सेंटर ऑफ  एक्सलन्सची उभारणी केली आहे. यात संजीवनी हे ग्रामिण भागातील पहीले महाविद्यालय आहे. सध्या निवड केलेले विध्यार्थी हे तृतिय वर्षातील  आहे. ते अंतिम वर्षात शिकत  असताना त्यांना त्यांच्या नियमितच्या अभ्यासाबरोबर अधिकचे प्रशिक्षण  देण्यात येईल. सध्या त्यांना कंपनीने रू ५. ५ लाखांचे वार्षिक  पॅकेज देवु केले आहे. मात्र प्रशिक्षणानंतर त्यांची  पुन्हा चाचणी घेतली जाईल व त्यातुन पात्र विध्यार्थी रू ७ लाखांच्या पॅकेजचे मानकरी ठरू शकतात.
प्रा. मोकळ यांनी शेवटी आभार मानले.
फोटो ओळी: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय व व्हर्चुसा कार्पोरेशन यांच्या परस्पर सामंजस्य करार झाला.कराराच्या फाईल्स हस्तांतरी करताना श्री अमित कोल्हे, श्री नारायणन, डाॅ. ठाकुर व इतर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here