संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४९ अभियंत्यांची कॅप्जेमिनी  मध्ये निवड  – अमित कोल्हे

0

 संजीवनीच्या जुन्या अभियंत्यांची उत्तम कामगिरी बघुन प्रत्येक कंपनीने वाढविले पॅकेज व नव्या अभियंत्यांची निवड संख्या
कोपरगांव :  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अलिकडेच कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कॅप्जेमिनी टेक्नाॅलाॅजी सर्विसेस इंडिया लिमिटेड (सीटीएसआयएल) या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या २०२१-२२ या बॅचच्या तब्बल ४९ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. मागील अनेक वर्षांपासून  अनेक नामवंत बहुराष्ट्रीय  कंपन्या संजीवनी मध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करून वेगवेगळ्या  अभियांत्रिकी शाखांमधिल अभियंत्यांची निवड करतात. संजीवनीचे अभियंत्ये तेथे उत्तम कामगिरी बजावतात व कंपनीच्या नावलौकिकात भर घालतात. तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्वतःचे ज्ञानही अपडेट करतात. या सर्व बाबींमुळे सर्वच कंपन्यांनी मागील काही वर्शांच्या तुलनेत वार्षिक  पॅकेज वाढवुन तर दिलेच, परंतु अभियंत्यांच्या निवड संख्येतही वाढ केली आहे. काही कंपन्यांनी तर वार्षिक पॅकेज रू ११ लाख देवु केले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की कोविड १९ च्या काळात संपुर्ण जग या विश्वव्यापक महामारीचा सामना करीत असताना संजीवनीचे संपुर्ण शैक्षणिक संकुलही त्यात सामिल होते. मात्र अशा  संकटातही आपल्या विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन स्वावलंबी बनविण्यासाठी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने आपले सातत्य कायम ठेवुन यश  संपादन केलेे. आतातर संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंट पाहीजे त्याला नोकरी मिळवुन देण्यासाठी कोणत्या कंपनीला कोणते अधिकचे ज्ञान पाहीजे यासाठी शिक्षण चालु असतानाच अधिकचा कोर्स  शिकवून अशा विध्यार्थ्यांना  नोकरी मिळवुन देण्यात यशस्वी होत आहे.  
अलिकडेच कॅप्जेमिनी कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये काॅम्प्युटर इंजिनिअरींग विभागचे २२, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी विभागचे ७, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचे ९, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे ३, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे ७ व एमबीए विभागाच्या एकाचा समावेश  आहे.      
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी  सर्व निवड झालेले विध्यार्थी-विध्यार्थीनी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.  तसेच संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंटची सर्व टीम, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले. निवड झालेल्या नवोदित अभियंत्यांना बोलवुन त्यांचा छोटेखानी कार्यक्रमात श्री अमित कोल्हे यांनी सत्कार केला. विशेष  म्हणजे हे सर्व निवड झालेले अभियंते गणवेशात  आले होते, म्हणजे ते गणवेशावर  किती प्रेम करतात, हे सिध्द झाले.
फोटो ओळी -संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ४९ अभियंत्यांची कॅप्जेमिनी कंपनीने नोकरीसाठी निवड केली. या सर्वांना बोलवुन संजीवनी ग्रुप ऑफ  इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here