कोपरगांव :- दि. २ नोव्हेंबर २०२२
महंत नारायणगिरी महाराज आणि संजीवनी उद्योग समुह हे अतुट नाते आहे त्यादृष्टीने या उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व त्यांचे सर्व सहकारी हे सर्वतोपरी मदत करून सहकार्य करतात. सरलाबेटावर महंत नारायणगिरी महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला असुन त्यानिमीत्त हरिहर महायज्ञाचे आयोजन केले असुन त्यात संजीवनी उद्योग समुहाने सहभागी व्हावे असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाचे निमंत्रण दिले त्याप्रसंगी ते बोलत होते. संजीवनी उद्योग समुह व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांच्यावतीने महंत रामगिरी महाराज व अन्य सेवेक-यांचा सत्कार करण्यांत आला.
युवा नेते व कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, कोपरगांव तालुक्याच्या नगरीत मौजे कोकमठाण येथे न भुतो न भविष्यती असा १७५ वा गंगागिरी महाराजांचा सप्ताह पार पडण्यांत महंत रामगिरी महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या वाणीने सप्ताह प्रहारेकरी व भाविकामध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.
संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सरलाबेटाचा वैशिष्टयपुर्ण धार्मिक संबंध असुन गंगागिरी महाराजांच्या कार्य चेतनेत महंत नारायणगिरी महाराजांनी दिलेले योगदान कुणालाच विसरता येणार नाही.
महंत रामगिरी महाराज पुढे म्हणाले की, कोपरगांव पंचक्रोशीसह राज्यात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारात जे काम केले त्याचा लौकीक असुन सात दशके त्यांनी यामाध्यमांतून केलेला सहकाराचा यज्ञ देशपातळीवर अजुनही तेवत आहे त्यातुन लाखो गोर गरीबांचे संसार प्रपंच अविरत सुरू आहेत. तोच वसा बिपीनदादा कोल्हे व त्यांच्या सहका-यांनी पुढे चालविला आहे. गंगागिरी महाराजांचा सप्ताह आणि कोपरगांवचा परिसर हे एक वेगळेच नाते आहे त्यात संजीवनीचा नामोल्लेख अग्रहक्काने घ्यावा लागेल. अविस्मरणीय अशा सराला बेटावर महंत नारायणगिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राज्यभरातुन भाविक भक्त उपस्थित रहात आहेत आणि या परिसराच्या अत्यंत जवळ हा कार्यक्रम होत असल्यांने भाविकांनी त्यात मोठया संख्येने सहभागी होवुन तन मन धनाने सहकार्य करावे असेही ते शेवटी म्हणाले.
फोटो ओळी कोपरगाव
सरला बेटावर होणाऱ्या हरिहर महायज्ञाचे निमंत्रण महंत रामगिरी महाराज यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांना दिले.