संजीवनी एम.बी.ए.च्या ७१ विध्यार्थ्यांना  नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  – अमित कोल्हे

0

संजीवनी  करीत आहे विध्यार्थी व पालकांची स्वप्नपुर्ती
कोपरगांव:
संजीवनी एम.बी.ए. विभागाच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील  एम.बी.ए.  अंतिम वर्षाच्या  ७१ विध्यार्थ्यांचे  विविध नामांकित कंपन्यांमध्ये आकर्षक वार्षिक  पॅकेजवर नोकरदार होण्याचे स्वप्न पुर्ण झाले असुन विद्यार्थी व पालकांनी संजीवनीवर टाकलेला विश्वास  संजीवनी एम.बी.ए. ने सार्थ ठरविला आहे, तसेच संजीवनी एम.बी.ए. ने सुध्दा विध्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याचे लक्ष पुर्ण केले आहेे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनराव कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजीवनी एम.बी.ए. विभागाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकाराने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत कॅप्जेमिनी, ओम लाजिस्टीक्स, बिग बास्केट, पॅरागाॅन सोल्युशन्स, रेवाचर, एसियन पेंटस्,  अॅक्सिस बॅन्क, रूरल शोअर्स, सुर्योदय फायनांस बॅन्क, सुआन, आयसीआयसीआय  प्रुडेंशिअल असेट मॅनेजमेंट, चोला इन्सुरंन्स, एन जे ग्रुप, क्लिअर स्पेस  रिअॅलिटी, इंडिया मार्ट, सोना पाॅली प्लास्ट, एचसीएल स्टेट स्ट्रीट सव्र्हिसेस, पेपर ट्रू , आयडीएफसी फर्स्ट  भारत, सिटी युनियन बॅन्क,  व काॅग्निझंट इंडिया प्रा. लि. अशा  नामवंत कंपन्या व बॅन्कांनी तब्बल ७१ विध्यार्थ्यांना  नोकरी सामावुन घेतले.
संजीवनीचा एमबीए विभागाला ऑटोनॉमस  दर्जा प्राप्त असल्यामुळे विविध कंपन्या अथवा बॅन्का यांना कोणते ज्ञान असलेला अधिकारी वर्गाची गरज आहे, ही गरज ओळखुन अभ्यासक्रमात नविन विषयांचा समावेश  करण्यात आला आहे. काही कंपन्यांनी एमबीए विभागाशी  सामंजस्य करार करून आमचा आमुख एक अभ्यासक्रम शिकवा , आम्हाला तुमचे इतके विध्यार्थी लागणारच, असे करारही केले आहे. यामुळे संजीवनी एमबीए आणि नोकरी हे समिकरण अधिक दृढ होत आहे,      
मोठ्या संख्येने विध्यार्थांना  नोकरी मिळण्यासाठी एम.बी.ए. विभागा अंतर्गत डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, एम.बी.ए. विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट ऑफिसर  प्रा. प्रकाश  मनोहरण यांनी विशेष  परीश्रम घेतले आणि विद्यार्थी व पालकांनी टाकलेला विश्वास  सार्थ ठरविला, असे कोल्हे शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here