सतारा/अनिल वीर : संविधानाच्या पदयात्रेने ठिकठिकाणी भेट देत प्रवास सुरु केला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तिसंगी येथे विहारात मुक्काम केला. तदनंतर कोल्हापूरला प्रस्थान केले.जिथे शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेल चालू करण्यासाठी मदत केली होती. त्या पवित्र स्थळी भेट दिली. शाहू महाराजांच्या स्मारकला अभिवादन करून पदयात्रा संविधानाचे महत्व सांगत रस्त्याने बिंदू चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन विसर्जित करण्यात आली. ज्या पुतळ्याचे उदघाटन स्वतः बाबासाहेबांनी केले होते.माणगाव येथे शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली पहिली अस्पृश्य सभा झाली होती.तेव्हा त्यामध्ये अध्यक्षीय समारोप करताना छ. शाहु महाराज म्हणाले, “आता तुम्हाला तुमचा नेता मिळाला आहे.आणि पुढे भविष्यात ते हिंदुस्थानचे पुढारी झाल्याशिवाय राहणार नाहीत.” त्यास्थळी जाऊन संविधान विश्लेषण केले.त्याच माणगावात बाबासाहेबांच्या नावानी लंडन हाऊस बांधले आहे.त्याच हाऊसमध्ये मुक्काम करुन पुढील प्रवासास सुरुवात करण्यात आली.सदरच्या टीममध्ये अनंत भवरे ( संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद ), दादासाहेब कांबळे ( जीवन मुक्ती सोशल फौंडेशन, पुणे ),आसाराम गायकवाड ( औरंगाबाद ),अरुण शिंदे ( सहकारी आणि चालक ), दिलीप लोखंडे ( सहकारी ) आदींचा समावेश होता.
फोटो : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना मान्यवर.(छाया-अनिल वीर)