सातारा /अनिल वीर : त्रिरत्न बौद्ध मानव विकास संस्था संलग्न त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्यावतीने येथील यशोधा टेक्निकल कॅम्पसमध्ये ५ दिवसीय निवासी संस्कार शिबिराचा समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
त्रिरत्न बौद्ध महासंघ सांगलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या धम्मसंस्कार शिबीराची सांगता झाली. या शिबीराचे नेतृत्व धम्मचारी रिताईन यांनी केले. त्यांनीं बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयाचा प्रवचन व गटचर्चेच्या माध्यमातून सविस्तर अभ्यास घेतला. सकाळी ध्यानाचे व लहान मुलांच्या खेळाचे नेतृत्व धम्मचारी कमलबोधी यांनी केले. पुजा पाठ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेतृत्व धम्मचारी श्वेतकेतू व धम्मचारिणी श्रद्धाप्रभा यांनी केले. सायंकाळच्या सत्रात बोधीसत्वांच्या चार प्रतिज्ञा याविषयावर धम्मचारी श्वेतकेतू, ज्ञानसेन व कमलबोधी यांनी प्रवचन दिले.प्रवचनकारांची ओळख व सुत्रसंचलन धम्मचारी कुशल बंधू यांनी केले.१७ शिबीरार्थींना धम्मदीक्षा धम्मचारी विजीतधम्म यांनी दिली. या शिबीरासाठी १३० शिबीरार्थींनी निवासी सहभाग घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी सांगली केंद्राचे धम्ममीत्र यांनी समन्वयक धम्ममीत्र अनंत धेंडे, अजित माने व संतोष कुदळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न केले. शिबीरासाठी वस्तू रुपाने, आर्थिक व श्रमदानाचे स्वरुपात ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे त्रिरत्न केंद्र यांनी आभार मानले.
फोटो : धम्मशिबिरातील एक प्रसंग.(छाया-अनिल वीर)