सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे तर्फे श्रीमती महिलांना दिवाळी निमित्त भेट वाटप.

0

उरण दि 25(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील सेवाभावी संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या सचिन तांडेल मेमोरियल फाउंडेशन कळंबुसरे तर्फे कळंबूसरे गावातील श्रीमती महिलांना दिवाळी निमित्त गृहोपयोगी वस्तू भेट स्वरुपात देण्यात आल्या.घरातील कर्ता पुरुष हरपल्यानंतर आपल्या कुटुंबाचा गाडा यशस्वीपणे पुढे हाकत आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करत असणार्‍या अशा नारीशक्तीला संस्थेमार्फत संस्थेच्या सभासदांकडून घरोघरी जाऊन गृहोपयोगी भेट वस्तू वाटप करण्यात आल्या.कळंबुसरे गावातील 105 महिलांना भेट वस्तू देण्यात आले . संस्थेकडून गेल्या 6 वर्षा पासुन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी वाडी येथे जिवनावश्यक वस्तू वाटप, वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन, पूरग्रस्तांसाठी थेट मदत, अक्षर भिंत उपक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, इको फ्रेंडली मखर स्पर्धा, तरुणांना रोजगार मार्गदर्शन शिबीर, श्रमदान, विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल गुणगौरव, कोरोना महामारीच्या काळात विविध क्षेत्रातील सेवा  देणार्‍या डॉक्टर आणि पोलिस यांचे संस्थेकडून सन्मान करण्यात आले. संस्थेच्या सर्व सभासदांकडून असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. सदर उपक्रम रत्नाकर केणी, कैलास पाटील, सुहास गावंड, प्रभूश्वर म्हात्रे, प्रविण पाटील, चंद्रहास जमदडे, सचिन भोईर, समीर म्हात्रे, मिलिंद ठाकूर, नीरज पाटील, नयन म्हात्रे, अमित पाटील, नंदकुमार तांडेल, प्रशांत पाटील या सर्वानी यशस्वीरित्या पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here