सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याचा दीपावली  निमित्त साखर वाटप कार्यक्रम जाहीर

0

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याच्या सभासदांना सालाबादप्रमाणे दिपावली निमित्त मोफत १५ किलो साखर वाटप करण्यात येणार असून सोमवार दि. १७ ऑक्टोंबर ते गुरुवार दि.२० ऑक्टोंबर या काळात कारखाना कार्यस्थळावर साखर वाटप केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.
            आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रेसर असलेला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखाना ओळखला जातो. या कारखान्याने स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर  व काटकसरीच्या धोरणामुळे ऊस उत्पादकांना उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही सभासदांना १५ किलो साखरेचे वाटप केले जाणार आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. ३०/०९/२०२२ अखेर मंजुर प्रति शेअर्सला १५ किलो साखर देण्याचे ठरविले आहे.ज्या सभासदांना कारखान्याने ओळखपत्र दिलेले आहे.त्यांनी सदर ओळखपत्र सोबत आणावे. त्यांना थेट गोडाऊन नंबर १३ मधून ओळखपत्राच्या नोंदीवर साखर देण्यात येईल. सभासद ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर साखर दिली जाणार नाही. कारखान्याने दिलेले ओरीजनल ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच जे सभासद ओळखपत्र घेऊन येणार नाहीत अशा सभासदांना सभासद ओळखपत्र असल्याशिवाय साखर दिली जाणार नाही. जे सभासद बाहेरगावी राहतात व त्यांचे ओळखपत्र तयार झालेले नाही अशा सभासदांनी साखर घेणेसाठी येताना एक फोटो व आधारकार्ड कॉम्प्युटर विभागाकडे जमा केल्याशिवाय साखर मिळणार नाही.  स्वत: येऊ न शकणाऱ्या  सभासदांनी सभासदाचा फोटो,आधारकार्ड व सोसायटी किंवा ग्रांमपंचायत यांचे सही व शिक्का असलेले अधिकारपत्र देवून दिलेल्या वेळेत साखर घ्यावयाची आहे. साखर वाटप कार्यक्रमानंतर असे अधिकारपत्र स्विकारले जाणार नाहीत. निव्वळ अधिकारपत्रावर साखर दिली जाणार नाही. तसेच सभासदाने स्वत:शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे. सकाळी ९ ते सायं ५ या वेळेत साखर वाटपाचे नियोजन करण्यात आले असून सर्व सभासद बंधू भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबद सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हा चेअमरन संतोष हासे,संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here