सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीला ४६ लाख ७२ हजाराचा नफा 

0

कोपरगांव :- दि. २४ सप्टेंबर २०२२ -वार्ताहर

          तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला ४६ लाख ७२ हजार रूपयांचा नफा झाल्याची माहिती उपाध्यक्ष दत्तात्रय दिनकर पवार यांनी दिली.

          सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीची ५८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते. 

         प्रारंभी इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ७० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळविलेल्या ३५ सभासदांच्या गुणवंत पाल्याचा रोख स्वरूपात बक्षिस देवुन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. अहवाल सालात दिवंगत झालेल्या सभासद मान्यवरांसह संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेवुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली. विषय पत्रिकेवरील सर्व विषय टाळयांच्या गजरात सर्वानुमते मंजुर करण्यांत आले. व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले सभासदांनी ते कायम केले. 

          संस्थेने सभासद कल्याण निधीतुन वैद्यकिय व मयत झालेल्या सभासदांच्या कुटूंबियांसाठी ८८ हजार रूपयांचे आर्थीक सहाय केले. संस्थेचे भागभांडवल ९३ लाख ३८ हजार रूपये असुन गुंतवणुक ५ कोटी २६ लाख रूपये आहे. मार्च अखेर संस्थेकडे ४ कोटी ७३ लाख रूपयांचे फंडस जमा आहेत. १२ कोटी १० लाख रूपयांच्या ठेवी असुन ११ कोटी ९२ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले असल्याचे व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी यावेळी सांगितले.

          या वार्षीक सर्वसाधारण सभेस सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, मुख्य रसायनतज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, एच. आर. मॅनेजर प्रदीप गुरव, शेतकी अधिकारी जी. बी. शिंदे, मुख्य अभियंता ए. के. टेंबरे, कामगार नेते मनोहर शिंदे, कोपरगांव तालुका साखर कामगार सभेचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे, मुख्य लेखापाल एस. एन. पवार, उपमुख्य लेखापाल प्रविण टेमगर, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, साखर गोदाम प्रमुख भास्करराव बेलोटे, बायोगॅस इनचार्ज पी. एस. अरगडे, गेस्ट हाउस इनचार्ज काशिनाथ वहाडणे, संस्थेचे संचालक सर्वश्री. आर. एस. लोंढे, ए. एस. नाईकवाडे, यु. पी. आहेर, आर. एम. डमाळे, डी. बी. केकाण, तज्ञसंचालक एस. बी. जाधव, निमंत्रीत संचालक बी. ए. कदम, कारखान्यांचे पदाधिकारी, खाते प्रमुख, उप खातेप्रमुख, सभासद, संस्था कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार संचालक चंद्रकांत जाधव यांनी मानले.

फोटो ओळी कोपरगाव

     सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कामगार पतपेढीची ५८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा संजीवनी कार्यस्थळावर शुक्रवारी पार पडली त्यात इयत्ता दहावी व बारावी परिक्षेत ३५ सभासदांच्या गुणवंत पाल्याचा उपाध्यक्ष रमेश घोडेराव, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखरसर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, संस्थेेचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सर्व संचालक, उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.

(छाया_ जय जनार्दन फोटो, संजीवनी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here