कोपरगांव : दि. १९ ऑक्टोंबर २०२२
मुक्त अर्थव्यवस्थेत प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्यानुरूप सहकारी साखर कारखानदारीतही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि बदल अत्यावश्यक असुन गुणवत्तेत निरंतर सुधारणा होण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यांचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत आयएसओ प्रणाली अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली.
टी. यु. व्ही. एस. यु. डी. संस्थेच्या नाशिक कार्यालयाचे मुख्य प्रशिक्षक बालकिशन पांचाळ यांनी अंतर्गत मुल्यांकन या विषयावर कारखान्यांचे सर्व खाते प्रमुख, उप खातेप्रमुख यांना तीन दिवस प्रशिक्षण दिले.
या कार्यशाळेचे उदघाटन करतांना कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी साखर कारखानदारीत जागतिक स्तरावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचा नांवलौकीक वाढविला असुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यायचे हा ध्यास त्यांनी कायमस्वरूपी बाळगुन तो सभासद शेतक-यांपर्यंत नेत यशस्वी करून दाखविला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी काळाची पावले ओळखून सहकारी साखर कारखानदारीत अहमदनगर जिल्हयात सर्वप्रथम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांला आयएसओ ९००१-२०१५ मानांकन मिळविले असल्याची माहिती दिली.
आय एस ओ ९००१-२०१५ या मानांकनाअंतर्गत एकुण ३१ खाते व विभाग प्रमुख, उप विभागप्रमुख यांना आय एस ओ ऑडिटर म्हणून प्रशिक्षत केले असुन त्यांनी सकारात्मक भूमिका प्रत्येक ठिकाणी घेवुन प्रत्येक विभागांचे ऑडिट पुर्ण करणेचे असून संस्थेने ठरवून दिलेल्या उददीष्टापेक्षा अधिकचे गुणवत्तापुर्ण यशस्विता देणेकामी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी शेवटी केले व देशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा आदर्शवत ठेवणेकामी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
आयएसओ मानांकनातुन कर्मचा-यांना प्रशिक्षित करून खर्चात बचत व उत्पादनांत कार्यक्षम पध्दतीने वाढ होण्यांसाठी कोणत्या उपाय योजना आवश्यक आहे याची प्रशिक्षक बालकिशन पांचाळ यांनी सौदाहरण माहिती दिली. शेवटी एच आर मॅनेजर प्रदिप गुरव यांनी आभार मानले.
फोटोओळी-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांत आयएसओ प्रणाली अंतर्गत तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यांत आली त्याचे उदघाटन कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले. प्रशिक्षणांत सहभागी झालेले खाते व विभाग प्रमुख उपविभागप्रमुख.