सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामधेनूत लक्ष्मीचा अविरत वास-बिपीनदादा कोल्हे. 

0

कोपरगांव दि. २३ ऑक्टोंबर २०२२

            सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी कामधेनु अविरत पूजेच्या माध्यमांतुन लक्ष्मीचा वास सभोवतालच्या प्रगतीत कायम ठेवत त्या माध्यमांतून उभारलेल्या सर्व संस्था आपल्या कुटूंबापेक्षाही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून त्यांचा नांवलौकीक राज्यासह देशपातळीवर उमटविला, बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी ग्रामिण अर्थकारणांसह शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांना घडविले त्यांची आठवण आणि स्मृती अनंत काळाच्या साक्षीदार आहेत, त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन आपण सर्वजण मार्गाक्रमण करत आहोत असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

            तालुक्यातील शिंगणापूर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे लक्ष्मीपूजन सालाबादप्रमाणे याहीवर्षी बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते व युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संपन्न झाले त्याप्रसंगी ते सभासद कामगारांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. 

            प्रारंभी उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कर्मयोगातुन शिंगणापूरच्या माळरानावर संजीवनीचे नंदनवन फुलविले. तंत्रज्ञान आणि शेतक-यांसह सर्व घटकांचा सर्वागीण विकास करण्यासाठी भगिरथ प्रयत्न केले, लोकनिरीक्षणाची पारख करून संकटसमयी मदतीचा हात देणारे कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे हे स्व. शंकरराव कोल्हे यांचा विचारांचा वारसा व वसा पुढे नेत आहेत.

            याप्रसंगी कारखान्यांचे रोखपाल दिलीप बोरनारे, बी. एस. गवारे, संभाजी चव्हाण, निवृत्ती आभाळे यांना दिपावली भेटवस्तु अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते देण्यांत आले. 

            बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचा चालू गळीत हंगाम मोठा आहे, १० लाख मे. टन उसाच्या गाळपातून उच्चतम साखरेसह ज्यूसपासून इथेनॉल उत्पादनावर भर राहणार आहे. संजीवनीने गेल्या साठ वर्षांत अनेक संकटांचा यशस्वीपणे मुकाबला करून साखर कारखानदारी व त्यावर अवलंबुन असणा-या उपपदार्थ उद्योगांचा देशपातळीवर यशस्वीपणे नांवलौकीक वाढविला आहे. 

           जागतिक बाजारात अमृत संजीवनी साखरेचे नांव आणि गुणवत्ता टिकविण्यांसाठी त्याचा दर्जा गेल्या तीन वर्षापासून सुधारला आहे. सहकारात महाराष्ट्र राज्य आघाडीवर होते पण मुक्त अर्थव्यवस्थेमुळे सहकारासमोर खाजगीचे आव्हान उभे राहिल्यांने सहकारी साखर कारखाने स्पर्धेत मागे पडतील या संकटाची चाहून आपण वीस वर्षापुर्वीच बोलून दाखविली होती. 

           जगाच्या स्पर्धेत राहण्यासाठी आता येथून पुढच्या काळात ज्या साखरेला मागणी असेल त्याचेच उत्पादन घ्यावे लागेल आणि तो विचार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने जाणून त्यादृष्टीने अत्याधुनिक मशिनरीची उभारणी हाती घेवुन काम सुरू केले आहे. या परिसरातील सभासद उस उत्पादक शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांची आर्थीक क्रयशक्ती वाढुन त्यांची उन्नती झाली पाहिजे हा विशाल दृष्टिकोन आपण नेहमी जपत आलेलो आहोत. कामगार वर्गासह सर्वांनी निष्ठा ठेवुन व्यवस्थापनास सहकार्य करावे असेही ते म्हणाले. 

फोटोओळी-कोपरगांव

           सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लक्ष्मीपुजन प्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सभासद कामगारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदि उपस्थित होते. 

(छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी.)

 फोटोओळी-कोपरगांव

          सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लक्ष्मीपुजन प्रसंगी कारखान्याचे रोखपाल यांना दिपावली भेटवस्तु संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव व संचालकांच्या हस्ते देण्यात आले. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे आदि यावेळी उपस्थित होते. 

(छाया- जय जनार्दन फोटो, संजीवनी)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here