कोपरगांव :- दि. २३ सप्टेंबर २०२२
महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅक्स फेडरेशन मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरावर युनिट बँका व १०० कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात कोपरगावच्या साई संजीवनी बँकेस राज्यस्तरावरील द्वितीय पुरस्कार अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते शुक्रवारी वितरीत करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष व युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सदरचा पुरस्कार स्विकारून तो माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतक-यांना समर्पित केला..
विद्याधर अनास्कर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, देशाच्या विकासात सहकारी संस्थाचा मोठा वाटा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करून त्यांची जबाबदारी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टाकुन सहकारी संस्थामध्ये विविध सुधारणा करण्याचे काम त्यामाध्यमातून सुरू आहे. ग्रामिण अर्थकारणात वित्त पुरवठा करण्यांत नागरी बँकाचे विशेष महत्व असून त्यातुन तळागाळातील गरजवंतांना सुलभ अटीवर अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. सहकारी संस्थांनी केलेल्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात येवून सर्व सहकारी संस्थांना यथोचित मार्गदर्शन फेडरेशनच्यावतीने दिले जाते असे सांगितले.
विवेकभैय्या कोल्हे याप्रसंगी बोलतांना की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत या बँकेला सभासद शेतकरी ठेवीदार हितचिंतकांच्या विश्वासाने प्रगतीच्या शिखराकडे नेले आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे अर्थनितीबाबत सतत मार्गदर्शन करत असतात. साई संजीवनी बँकेकडे गेल्या आर्थीक वर्षात ८२ कोटी रुपयांच्या ठेवी असून त्यापैकी ५६ कोटी रूपयाचे कर्ज वितरण केले बँकेला ८५ लाख रूपयांचा नफा झाला आहे. थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष रेवजी कंजाजी आव्हाड, संचालक गोरख आव्हाड, संभाजीराव रक्ताटे, बापूराव बारहाते, अशोकराव टुपके, मुख्य कार्यकारी अधिकारी पदमाकर सभारंजक आदि उपस्थित होते. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालक विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, वित्त संस्थांनी बँक व्यवस्थापनाचे अभिनंदन केले आहे.
फोटोओळी-कोपरगांव-
महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन मुंबई यांच्यावतीने राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट द्वितीय बँक पुरस्कार अध्यक्ष विद्याधर अनारकर यांच्या हस्ते प्रदान करण्यांत आला त्याचा स्विकार बँकेचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी केला.
(छाया जय जनार्दन फोटो, संजीवनी)