
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील साञळ येथिल तरुणाने जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने जाणिवपुर्वक व्हाँटसअप ग्रुपवर व्देशभावना पसरवीणारा लेख टाकला त्यामुळे जातीय तनाव निर्माण झाला असल्यामुळे जयश बाळासाहेब वाघचौरे रा.सात्रळ याच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिस सुञा कडून समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील साञळ येथिल जयश बाळासाहेब वाघचौरे रा.सात्रळ या तरुणाने दोन जातीमध्ये तेढ निर्माण होईल या उद्देशाने जाणिवपुर्वक व्हाँटसअप ग्रुपवर व्देशभावना पसरवीणारा लेख टाकला त्यामुळे दोन जाती मध्ये तेढ निर्माण झाला होता. नवाज अशिफ इनामदार यांने दिलेल्या फिर्यादी वरुन जयश बाळासाहेब वाघचौरे याच्या विरोधात भा.द.वि. कलम 153अ, 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
साञळ येथिल जयश वाघचौरे या तरुनाने व्हाँटसअप ग्रुपवर मुस्लीम समाजा विरोधात व्देशभावना पसरवीणारा लेख टाकला त्यामुळे गावात दोन जाती मध्ये तेढ निर्माण झाला होता.राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गावात जावून दोन्ही जातीच्या लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले.जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल जयश वाघचौरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर जातीय तणाव शांत झाला. गु.र.नं कलम 955/2022 भा.द.वि. कलम 153अ, 505 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नाऱ्हेडा हे करीत आहेत.