सातारा/अनिल वीर :’ महाडपासून सुरू झालेली संविधान रॅली सातारा येथे आल्यानंतर उत्स्फूर्त असे स्वागत केले. तदनंतर नागपूरकडे रवाना झाली.
नागपूर येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी (संविधान दिन) पोहचणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली आहे.त्यामुळे सातारा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भेट देऊन अभिवादन केले. सातारा शहरातुन जयघोषात रॅली काढण्यात आली. संविधान प्रचार मोहीम रॅलीचे स्वागत करून शहराच्या मुख्य ठिकाणी, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून रॅलीला पदयात्रेच्या माध्यमातून संपन्न झाली. संविधान जागृतीची प्रचारसभाही पार पडली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,धम्मबांधव ज्येष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष बी.एल.माने,राष्ट्रोत्सव संयोजन समोतीचे उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,ज्येष्ट नेते विलासराव कांबळे, बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते दिलीप फणसे, कुमार गायकवाड,पाली भाषाभ्यासक दिलीप सावंत व प्रसाद गायकवाड,प्रकाश काशीळकर, गणेश कारंडे,शाहिर यशवंत भाले आदी विविध संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, मान्यवर,संविधानप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
फोटो : संविधान रॅली प्रचारकबरोबर सातारवासीय.(छाया-अनिल वीर)