सातारा/अनिल वीर : जिल्हा (पुर्व) रिपब्लिकन सेनेची सहविचार सभा शासकीय विश्रामगृह,कोरेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड होते.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सभेस पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य गणेश कारंडे, जेष्ट मार्गदर्शक दादासाहेब केंगार व सुधाकर काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरेगाव,खटाव,माण,फलटण आणि खंडाळा या तालूक्यातील प्रमूख कार्यकर्त्यांशी चर्चा – विनिमय झाला. बैठक घेण्यात आली. रिपब्लीकन सेनेचे सर सेनानी आनंदराज आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर डबराशे यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आणी दिलेली जबाबदारी पार पाडावयाची आहे.तेव्हा सर्वच कार्यकर्त्यांनी जोमाने काम केले पाहिजे. त्याकरीता प्रथम सर्वांनी आपापल्या तालूक्यातून प्रत्येकी दोन जिल्हा प्रतिनीधी जिल्हा कार्यकारिणीसाठी द्यायचे आहेत. पाठवायचे आहेत.तेव्हा दि.२७ ऑक्टोबर रोजी दहीवडी, ता. माण येथील शासकीय विश्रामगृहात होणाऱ्या सहविचार सभेत नियोजीन करून सातारा पुर्व जिल्हा यांची कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. तद्नंतनर राज्य कमीटीला ती यादी सादर करण्यात येणार आहे.याशिवाय,आपापल्या तालूक्यातील विभागीय/जि.प. गट अशी कार्यकर्त्यांशी चर्चा करून दि.१ नोव्हेंबरपासून तालूक्याचा दौरा होणार आहे. यावेळी कांतीलाल खुंटे,सुनिल खरात, नानासाहेब बडेकर, भाऊसाहेब मोहोड, नितीन भोसले, संतोष घाडगे,लक्ष्मण वाघमारे,जगन्नाथ वाघमारे आदी पदाधिकारी व तालूका प्रतिनीधी उपस्थीत होते. कोरेगाव तालूका महासचीव विजयराव मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.
फोटो : चंद्रकांत खंडाईत यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड,पदाधिकारी व कार्यकर्ते.(छाया-अनिल वीर.)