सातारा/अनिल वीर : युनिफाइट वेल्फेअर असोसिएशन सातारा आयोजित दहावी राज्य स्तरीय स्पर्धेच्या नियोजनसाठी आयोजन करण्यात आले होते.सातारा जिल्ह्याला दुसऱ्यांदा बहुमान मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
सातारा जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदिपभाऊ शिंदे यांनी सर्व संचालक मंडळाचे राज्य, विभाग व जिल्हा पंच यांचे कौतुक केले.स्पर्धेला लागेल ती मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सदरची स्पर्धा दि.१२ व दि.१३ नोव्हेंबर रोजी किसन वीर महाविद्यालय, वाई येथे स्पोर्ट्स इंडोर हाॅल या ठिकाणी होणार आहे. स्पर्धा कशा व कोणत्या पद्धतीने होणार आहे? त्याचे नियम नियमावली आयोजनाचे काम तसेच इतर अनेक महत्वपूर्ण गोष्टीवरती जिल्हा सचिव नितीन सूर्यवंशी यांनी संचालकासमावेत चर्चा केली. उपस्थित संचालक व पदाधिकारी अविनाश गोंधळी, सुनिल जाधव,अनिल शेलार, गणेश शिंदे,लालसाब मुलांणी, सागर येवले,अर्जुन कळंबे,संदिप वाघमारे,अंकुश माने,योगेश मोरे,अप्पा कांबळे, अक्षय साळुंखे,यश जाधव,तेजस गायकवाड,आकाश कांबळे, साक्षी,वैहिदा मुलांणी, रेशमा मुलाणी आदी उपस्थित होते.
फोटो : डॉ. संदीपभाऊ शिंदे व मान्यवर.(छाया-अनिल वीर)