सातारा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यशाळेचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर : नविन बौध्दाचार्य होणायासाठी सुवर्ण संधी भारतीय बौद्ध महासभेने निर्माण केली आहे.तेव्हा शनिवार दि.२२ रोजी एक दिवशीय बौद्धाचार्य परीक्षा तयारी कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे. 

     आजी-माजी अध्यक्ष,सदस्य , श्रामणेर, बौध्दाचार्य,इच्छूक सदस्य व संपुर्ण कार्यकारणी यांनी सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा. तेव्हा एक दिवशीय बौद्धाचार्य परीक्षा तयारी कार्यशाळेस आवश्य उपस्थित रहावे. असे आवाहन सातारा तालुका शाखेने केले आहे.तेव्हा दि. २२ रोजी शनिवार सकाळी १०-३० वा. 

 सांस्कृतिक भवन,सदरबझार (मिलींद कॉलनी) येथे एक दिवशीय बौद्धाचार्य परीक्षा तयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यांना बौध्दाचार्य परीक्षेत प्रवेश घेण्याचा आहे. अधिक माहितीसाठी पुढीलप्रमाणे दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधून नांव नोंदणी करावी.नंदकुमार काळे (जिल्हा संस्कार उपाध्यक्ष) व विकास तोडकर (तालुका संस्कार उपाध्यक्ष) यांच्याशी संपर्क साधावा.अशीही माहिती अध्यक्ष तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने व महासचिव ऍड. विजयानंद कांबळे यांनी दिली आहे. बौध्दाचार्य परीक्षा रविवार दि.३० रोजी सकाळी १० वा. महाविहार, कराड येथे होणार आहे.अशीही माहिती संयोजकांनी जिल्हाध्यक्ष भागवत भोसले यांच्यावतीने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here