
सातारा : भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृतमहोत्सवी जाहीर नागरी सत्कार सोमवार दि.१० रोजी सकाळी ११।। वा सुरभी मंगल कार्यालय,सातारा येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
गेली २५ वर्षे धम्म कार्यात कार्यरत असणारे असामान्य व्यक्तिमत्व, निवृत्त असिस्टंट कमिशनर सेंट्रल एक्साइज, भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव व विद्यमान जिल्हाध्यक्ष व्ही.आर. थोरवडेसाहेब यांच्या प्रदीर्घ धम्म कार्याविषयी व त्यांच्या समाजसेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आला असून यापूर्वी, त्यांना बंधुत्व धम्मरत्न पुरस्कारासह अनेक संस्थानी गौरविलेले आहे.
सदरच्या कार्यक्रमास राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, माजी राष्ट्रीय सचिव एन.एम.आगाणे (काका) आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास धम्मबांधव उपासक – उपासिकांनी उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा सरचिटणीस विद्याधर गायकवाड,जिल्हा कोषाध्यक्ष श्रीमंत घोरपडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बारसिंग, जिल्हा पदाधिकारी,तालुका व कार्यकारणी यांनी केले आहे.