साताऱ्यास मेघगर्जनेसह वादळी पावसाने झोडपले.

0

सातारा.. गेले तीन दिवस हैराण करणाऱ्या अवकाळी पावसाने आज गुरुवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सातारकरांना नको नकोसे केले आहे .

कडकडाटासह जोरदार मेघगर्जना अंधारून आलेले वातावरण त्यातच बोचरे वारे आणि थंडगार हवेने सातारकरांना अक्षरशः ऐन ऑक्टोबर महिन्यात नको नको से केले आहे .

त्यातच अधून मधून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे अंधारातच सातारकरांना दिवस रात्र काढावा लागत आहे..गेले तीन दिवस सायंकाळी रात्री उशिरा सुरू होणाऱ्या तर कधी कधी सकाळी सात वाजता दुपारी 11 वाजता पडणारे या पावसाला वेळेचे भानच राहिले नाही .त्यामुळे सातारकरांना अक्षरशः घरातून बाहेर पडणे ही मुश्किल झाले आहे चाकरमाने लोकांना तर पावसापासून बचाव करत कामाचे ठिकाणी ये-जा करणे ही तितकेच मुश्किल झाले आहे. त्यातच गेले चार महिने सलग पडणाऱ्या पावसाने सातारा शहर परिसरातील प्रमुख रस्त्यांची ही पूर्ती वाट लागली आहे .रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशीच काहीशी परिस्थिती सध्या वाहन चालकांना पाहायला मिळत आहे त्यामुळे या रस्त्यातून ये-जा करतानाही अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातच सुरू झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक रस्तेच धुवून काढले असून सातारा शहरातील राजवाडा, राधिका रोड, पालिका मुख्यालय तसेच झेडपी चौकात पाण्याची तळी साठलेली पाहायला मिळत होती गेले अनेक दिवस हा पाऊस साठवून वारंवार येत असल्यामुळे हवेत वाढणारा गारठा यामुळे आजाराचे प्रमाणही तितकेच वाढले आहे. सर्दी ,खोकला, ताप या विचित्र आजारांनी सध्या दवाखान्यामध्ये रुग्णांची उपचारासाठी गर्दी दिसून येत आहे. हा पाऊस नकोसा करत असल्यामुळे ऐन दिवाळी सणासाठी तयारीला लागलेले सर्वच नागरिक हताश होत आहेत.

 सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात सांगली येथील स्मार्ट एक्सपोर्टच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी फेस्टिवल ही अक्षरशः रद्द करण्याची वेळ आलेली आहे .हा दिवाळी फेस्टिवल येत्या 14 ऑक्टोबर पासून 18 ऑक्टोबर पर्यंत साजरा होणार होता. मात्र पावसाने सुरू असलेला धुमाकूळ व होणारे नुकसान यामुळे हा फेस्टिवलच रद्द केल्याची माहिती संयोजक सोमनाथ शेटे यांनी प्रतिनिधीला दिली.

 दरम्यान हा अवकाळी पाऊस हा शेती पिकाचे नुकसानच करणारा ठरत आहे सध्या शेतात असलेल्या काढणीला आलेल्या सोयाबीन घेवडा या पिकांना हा पाऊस मारणारा ठरत आहे कारण अनेक शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पक्व झालेल्या घेवडा तसेच सोयाबीनच्या शेंगांना मोड येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here