सामाजिक कार्यकर्ते रमेशबुवा फडके यांचे निधन

0

उरण दि 28 ( विठ्ठल ममताबादे)पनवेल तालुक्यातील नेरे येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, पैलवान उस्ताद , उत्तम संगीत शिक्षक, चांगले वक्ते,आदर्श सरपंच म्हणून सर्वांना सुपरिचित असलेले रमेशबुवा भागा फडके यांचे शनिवार दि 24/9/2022 रोजी दु:खद निधन झाले.  एम जी एम हॉस्पीटल कळंबोली नवी मुंबई येथे उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्यूसमयी रमेश बुवा फड़के यांचे वय 68 वर्षे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,3 मूले,1 मूलगी असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. स्व.रमेशबुवा फडके यांचा  दशक्रिया विधी (दहावा) सोमवार दि 3/10/2022 श्री क्षेत्र नाशिक येथे होणार आहे.तर उत्तरकार्य (तेरावा ) शुक्रवार दि 7/10/2022 रोजी त्यांच्या राहत्या घरी नेरे येथे होणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नसल्याची माहिती त्यांचे चिरंजिव योगेश फडके यांनी दिली.आपले आयुष्य नेहमी दुसऱ्याच्या कल्याणासाठी झिजविणारे स्व. रमेशबुवा फड़के यांच्या निधनाने नेरे ग्रामस्थ , कुटुंब परिवार, पनवेल , उरण तालुक्यातील शिष्य परिवारांवर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here