मुक्तीभूमी स्मारक व वाचनालयास दिली सदिच्छा भेट
येवला (प्रतिनिधी)
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व धर्मग्रंथा सोबत सामाजिक,आर्थिक,राजकीय,सांस्कृतिक लोक जीवनाचा चिंतनशील अभ्यास केला असून विद्यार्थी दशेत अठरा ते वीस तास बसून दनार्जन करण्याची किमया केली असून आज आपणास उपलब्ध असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयांचा उपयोग आपण आपल्या सर्वांगीण विकासासाठी करावा आणि जिद्द चिकाटी मेहनतीने आयुष्य फुलविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय बहुजनांची ज्ञान केंद्रे बनावीत असे प्रतिपादन आदिवासींच्या जल,जंगल,जमिन हक्कासाठी लढणाऱ्या लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व
मुक्तीभूमी स्मारक व सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.
येवला येथील धर्मांतर घोषणा व तदनंतर धम्म दीक्षा हि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली महान क्रांती असल्याचे त्या म्हणाल्या मुक्तीभूमी स्मारक येथे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला उजाळा दिला.
समता प्रतिष्ठान येवलाचे संचालक सलील कोकाटे, मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे,मुक्तीभूमी वाचनालयाचे संस्थापक शरद शेजवळ, अध्यक्ष सुरेश मामा खळे,अधीक्षक बी.डी.खैरनार व मुक्तीभूमी अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सलील कोकाटे यांच्या हस्ते प्रतिभा शिंदे यांना भारतीय संविधान ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचलन शरद शेजवळ यांनी केले.आभार सुरेश खळे यांनी मानले.