उरण दि. 4 (विठ्ठल ममताबादे)उरण शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ गणपती चौक येथील मंडळातर्फे नवरात्रौत्सवात विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक उपक्रम राबविण्यात झाले असून सोमवार दि 3 ऑक्टोबर 2022 रोजी सांयकाळी मंडळातर्फे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमात मंडळाचे सर्व महिला पदाधिकारी सदस्य उपस्थित होत्या. सदर मंडळाची स्थापना 1974 साली झाली असून मंडळाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,उपाध्यक्ष मधुकर पेडणेकर, उपाध्यक्ष अभिजित पाटील, सचिव प्रकाश गावंड, सहसचिव शैलेश पंडित, खजिनदार – अनेश कोळी, सहखजिनदार नरेश राऊळ तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी,सभासद कार्यकर्ते यांनी विविध उपक्रम व नवरात्रौत्सव साजरे करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक भक्तानी या देवीचे दर्शन घेतले.या मंडळाचे विशेष म्हणजे यंदा मंडळातर्फे भगवान शिवशंकर व पार्वतीमाता तसेच महाकालीका माता यांच्यातील युद्धाचा प्रसंग मूर्तीच्या स्वरूपात(चलचित्राच्या स्वरूपात )दाखविण्यात आला आहे.एकंदरित सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ गणपती चौक तर्फे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आला.