उरण दि 6(विठ्ठल ममताबादे) दस-याच्या शुभमुहूर्तावर उरण तालुक्यातील वशेणी गावात बुधवार दि.5/10/2022 रोजी सहा सिटिंग बेंचेसचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने केले होते. सदर कार्यक्रमास वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड ,डाॅक्टर रविंद्र गावंड, पुरूषोत्तम पाटील,सतिश पाटील,महेंद्र पाटील,कैलास पाटील,अनंत तांडेल,गोवर्धन पाटील, राजेंद्र पाटील, श्रीमती आनंदी पाटील रघुनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
वशेणी गाव अंतर्गत नागरिकांना बसण्याची सोय व्हावी म्हणून संदेश गावंड यांनी तीन बेंचेस, दिले तर आनंदी तांडेल, हसूराम म्हात्रे ,कुमार सुयोग ठाकूर यांनी प्रत्येकी एक एक बेंचेस दिल्या बद्दल मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.