सिडकोने काढलेल्या गरजेपोटी बांधकामाच्या जी. आर विरोधात गावठाण हवक परिषद

0

उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे) सिडको प्रकल्पग्रस्त गावातील शेतकरी व त्यांच्या वारसांनी, बांधलेली घरे व जमीन मालकी हक्काने करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तसेच 25 फेब्रुवारी 2022 रोजी सिडकोने काढलेल्या गरजेपोटी बांधकामाच्या जी. आर विरोधात शनिवार दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:30 वा. मल्टीपर्पज हॉल,जेएनपीटी,टाउनशिप येथे गावठाण हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून म्हाडाचे माजी अध्यक्ष तथा जागतीक किर्तीचे आर्किटेक्चर चंद्रशेखर प्रभु उपस्थित राहणार आहेत.या परिषदेत गरजेपोटी बांधलेले बांधकाम, सिडकोने काढलेल्या अन्यायकारक जीआर विरोधात व मालकी हक्का संबधीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या गावठाण हक्क परिषदेला प्रकल्पग्रस्तांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जेएनपीटीचे विश्वस्त कॉग्रेड भूषण पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here