सॉफ्टबॉल स्पर्धेत पवन गुंजाळ याने पटकावले सुवर्णपदक 

0

संगमनेर : गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सॉफ्टबॉल  संघात  जिल्ह्यातून एकमेव निवड झालेल्या संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील पवन शिवाजी गुंजाळ या खेळाडूंने सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

        गुजरातची राजधानी गांधीनगर मध्ये झालेल्या  दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत महाराष्ट्र संघाने आंध्रप्रदेश संघाला ८० होमरनने पराभूत केले.त्यानंतर झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर १० होमरनने विजय नोंदवला. महाराष्ट्र संघातील खेळाडू कल्पेश कोल्हे, गौरव चौधरी, जयेश मोरे, धीरज बाविस्कर, प्रीतेश पाटील, सुमेध तळवेलकर, अभिषेक सेलोकर, सौरभ टोकसे,पवन गुंजाळ या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकाविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here