सोनारी-करळ येथे ब्रँडलर या शूज व चप्पल शोरुमचे उदघाटन.

0

उरण दि ६ ( विठ्ठल ममताबादे ) सोनारी -करळ गावात दसऱ्याच्या मुहूर्तावर ब्रँडलर या शूज व चप्पल शोरुम च उध्दघाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.सोनारी गावातील होतकरू तरुण अल्पेश कडू यांनी ग्रामीण भागातील तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण व्हावा यासाठी सदर व्यवसायाची सुरुवात केली आहे.

   मराठी तरुण हे स्वतः चा उद्योग किंवा व्यवसाय न उभारता नोकरीच्या शोधार्थ आपले आयुष्य घालवत आहे.तरी करळ सोनारी गावातील अल्पेश कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागातील मराठी तरुणांनी नोकरीच्या शोधार्थ आपले आयुष्य न घालवता स्वतः चा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांनी अल्पेश कडू यांच्या ब्रँडलर या शोरुम च्या  उध्दघाटन प्रसंगी व्यक्त केले.यावेळी अल्पेश कडू यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचे आईवडील यांनी कौतुक केले.तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत सह परिसरातील आजी, माजी सरपंच उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच गाव परिसरातील मित्र मंडळाने शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here