कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात अनेक खाजगी शाळेच्या स्कुल बस असून सकाळी व संध्याकाळी या स्कुल बस शहरातील मुलांना शाळेत घेऊन आणून सोडत असताना अचानक रस्त्यावर थांबून मुलांना उतरून देतात. मात्र यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा व छोटे मोठे अपघात घडतात त्यामुळे पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने या स्कुल बस चे थांबे निश्चित करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की एका बाजूला सरकार विद्यार्थी संख्ये अभावी सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे मात्र खाजगी शाळाना प्रोत्साहन दिले जात आहे या खाजगी शाळा मुलांना थेट दारात बस पाठवून सुविधा देतात त्या बदल्यात पालकां कडून मोठी रक्कम वसूल केली जाते कोपरगाव तालुक्यात अनेक खाजगी शाळा सुरू आहेत या विविध शाळांच्या बस रोज सकाळ संज्ञाकाळ मुलाना अगदी घरापर्यंत आणून सोडतात अनेकदा या बस अरुंद गल्ली बोळातून वळत नाहीत त्याच प्रमाणे बस अगदी दारासमोर थांबली पाहिजे. अशी पालकांची मागणी असते. त्यामुळे या बस अचानक कुठेही थांबतात त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अनेकदा छोट्या मोठ्या अपघाताना सामोरे जावे लागते. मागील पिढीला जवळ शाळा नव्हत्या त्यामुळे अनेकदा तीन चार किलो मीटर शाळेत पायी अथवा सायकलवर जावे लागायचे. लहान मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. मात्र सद्या दारात बस उभी राहत असल्याने या लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांची पुरेशी माहिती होत नाही. त्यामुळे ही मुले रस्त्यावर चालताना अनेकदा वेंधळून जातात. त्यामुळे मुलांमध्ये धीटपणा कमी होत आहे.
वरील सर्व गोष्टी चा विचार करून कोपरगाव पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने या स्कुल बसना शिस्त लावणे आवश्यक असून विविध ठिकाणी स्कुल बस थांबे निश्चित केले तर वाहतुकीस अडथळा व छोटे मोठे अपघात होणार नाहीत.
ReplyForward |